|Thursday, February 21, 2019
You are here: Home » Top News » महाराष्ट्रात पेट्रोल सर्वात महाग, मुंबईत गाठला उच्चांक

महाराष्ट्रात पेट्रोल सर्वात महाग, मुंबईत गाठला उच्चांक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गगनभेदी दराने महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात विक्रमी दर नोंदवला आहे. मुंबईत रविवारी पेट्रोलसाठी लिटरमागे तब्बल 86.25 रूपये मोजावे लागले. आज पेट्रोलने त्यापुढे मजल मारत 86.56 रूपयांपर्यंत मजल मारली आहे. हा मुंबईतील आजपर्यंतचा सर्वोच्च दर आहे. यापूर्वी मुंबईत 29 मे रोजी पेट्रोल दर 86.24 रूपये होता, तो विक्रम रविवारी मोडला.

आज पेट्रोलदराने त्यापुढे मजल मारली. मुंबईचा कालचा पेट्रोल दर हा मेट्रो सिटीमधीलही सर्वात जास्त दर होता. दुसरीकडे डिझेलही पेट्रोल दराला गाठत आहे. कारण पेट्रोलने नवा उच्चांक गाठल्यानंतर डिझेलनेही आगेकूच कायम ठेवली. डिझेलला रविवारी प्रतिलिटर 75.12 रुपये मोजावे लागले. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे. अमरावतीतील आजचा पेट्रोल दर हा 87.81 रुपये प्रति लिटर इतका आहे. त्यानंतर औरंगाबदचा नंबर लागतो. औरंगाबादेत पेट्रोल 87.61 रूपये प्रति लिटर दर आहे.

Related posts: