|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » फक्त 999 रूपयांत विमानप्रवास

फक्त 999 रूपयांत विमानप्रवास 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नजीकच्या काळात विमानप्रवास करू इच्छिणाऱयांसाठी एक खुशखबर आहे. इंडिगो एअरलाइन्सने आपल्या 10 लाख विमान तिकिटांची विक्री सुरू केली आहे. या सेलअंतर्गत तिकिटाची किमान किंमत 999 रुपये असणार आहे. आजपासून सुरू झालेला हा सेल 6 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. हा सेल 18 सप्टेंबर 2018 ते 30 मार्च 2019 पर्यंतच्या विमानप्रवासासाठी लागू असणार आहे.

2019 पर्यंतच्या विमानप्रवासासाठी लागू आहे. कंपनीचे मुख्यव् वाणिज्य अधिकारी विल्यम बोल्टर म्हणाले, ’आम्ही चार दिवसांचा फेस्टीव्हल सेल सुरू केला आहे. यात ग्राहक आमच्या पूर्ण नेटवर्कमध्ये कुठेही प्रवास करू शकतात. तिकिटाची किंमत 999 रुपयांपासून पुढे असेल.’मोबाईल वॉलेट मोबिक्वकिच्या माध्यमातून पैसै भरणाऱया ग्राहकांना 600 रुपयांपर्यंत म्हणजेच 20 टक्के कॅशबॅकही मिळणार आहे.