|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भाजपा नगरसेवकांच्या बैठकीत आयुक्तांच्या कारभाराचा पर्दाफाश

भाजपा नगरसेवकांच्या बैठकीत आयुक्तांच्या कारभाराचा पर्दाफाश 

प्रतिनिधी/ सांगली

शहरातील कचरा उठाव, गटारीची स्वच्छता करणे हे नगरसेवकांचे काम नाही, धोरणात्मक निर्णय आणि विधायक कामे करण्यासाठी आम्हाला निवडून दिले आहे. मनपात भाजपाची सत्ता आली नाही. त्यामुळे प्रशासनाने कामकाजाची पद्धत बदलावी. कागदोपत्री कामकाज न करता प्रत्यक्षात कामे करावीत. फाईलींचा प्रप्रवास थांबवा, अशा कडक शब्दात नगरसेवकांनी आयुक्त आणि प्रशासनाच्या कारभाराचा पर्दाफाश केला. नगरसेवकांच्या या भूमिकेला उपस्थित खासदार, आमदारांनीही गांभीर्याने घेत चांगले कामकाज केल्याची शाबासकी मिळण्याऐवजी कोअर कमिटीसमोरच कारभाराचा पंचनामा झाल्याने आयुक्त आणि प्रशासन सपशेल तोंडावर आपटले. कचऱयाच ढीग तसेच असताना मनपाचा नंबर आलाच कसा असाही सवाल यावेळी खासदार, आमदार यांनी केला.

नुतन नगरसेवकांना मनपा कामकाज आणि केंद आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती व्हावी यासाठी सोमवारी मनपामध्ये बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीला खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी आमदार दिनकर पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, मुन्ना कुरणे, सुरेश अवटी, नीता केळकर आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये प्रारंभी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी मनपाच्यावतीने तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. याशिवाय मनपाने शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाची तसेच मनपाच्या अडचणीबाबत माहिती दिली. आयुक्तांच्या या माहितीवर नगरसेवकांनी आक्षेप घेत चांगलेच धारेवर धरले. स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये मनपाचा आलेला नंबर चुकीचा आहे. दैनंदिन कचऱयाचा उठाव होत नाही, नागरी सुविधांचा मोठा अभाव आहे.

 नागरिकांना किरकोळ कामासाठीही हेलपाटे मारावे लागत आहेत. कागदोपत्री कामकाजापेक्षा वस्तुनिष्ठ कामे झाली पाहिजेत. मागील सत्ताधाऱयांनी भ्रष्ट कारभार केला म्हणूनच भाजपाला निवडून दिले आहे पुन्हा ‘ये-रे मागल्या’प्रमाणे होणार असले तर आम्हीच आवाज उठवू अशा स्पष्ट शब्दात नगरसेवकांनी इशारा दिला. नगरसेवकांची भूमिका आणि आक्रमकतेची दखल उपस्थित खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ  यांच्यासह कोअर कमिटीच्या सदस्यांनी घ्यावी लागली. त्यानीही प्रशासनाच्या कामकाजात सुधारणा करून गतीने जनतेची कामे मार्गी लावण्याची सुचना केली. दरम्यान, चांगले काम केल्याने शबाशक्की मिळण्याची अपेक्षा असलेल्या आयुक्तांना मात्र बैठकीत सपशेल तोंडावर पडण्याची वेळ आली.

कुपवाडला 40 कोटी द्या : गजानन मगदूम

बैठकीमध्ये नगरसेवक गजानन मगदूम म्हणाले, कुपवाड भाग अविकसित असून येथे,. रस्ते, डेनेज, गटारी आदी नागरी सुविधांचा अभाव असून कुपवाडला निधी देताना कायमच अन्याय झाला आहे. यामुळे या भागाच्या विकासासाठी 40 कोटीचा निधी द्यावा. तसेच कुपवाड भागात मोठया प्रमाणात कामगार असल्याने मनपाच्या वतीने उभारण्यात येणारे मल्टिस्टेट हॉस्पिटलही कुपवाडमध्येच व्हावे अशी  मागणी यावेळी त्यांनी केला. आमदार गाडगीळ यांनीही हा दवाखाना कुपवाडमध्येच व्हावा यासाठी आवश्यक जागा शोधण्याची सूचना प्रशासनाला दिली.

आनंदा देवमाने यांच्याकडून आयुक्त टार्गेट

बैठकीत नगरसेवक आनंदा देवमाने यांनी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्या कारभारावर सडकून टीका करताना आयुक्तांनी सादर केलेली माहिती चुकीची आहे. स्वच्छ अभियानात मनपाला नंबर कोणी दिला असा सवाल करून ते म्हणाले, प्रशासनाच्या कारभारावत बदल झाला पाहिजे, जनतेनी आम्हाला कशाला निवडूण दिले आहे. फुशारकी मारायला आलो नाही. मिरजेतील डेनेजचे काम फक्त 25 टक्के झाले असताना आयुक्त 70 टक्के झाल्याचे सांगत आहेत. आयुकक्तांनी दिलेली सर्व योजनांची माहिती चुकीची आहे. निवडूण आल्यानंतर साधी टुबही मिळत नाही. कसला कारभार. कंटेनर फुटले आहेत ते दुरूस्त करण्याएwवजी घोटाळयासाठी नवीन घेण्याचा उदयोग कशाला. शिवाजीरोडवर खड्डेच खड्डे पडले असून ते का मुजविले जात नाही. निवडून येऊन काय उपयोग, ही कामे होत नसतील तर प्रशासन म्हणून काय करता. अधिकाऱयांचे अधिकार काढून घेतले. मग तुम्ही एकटेच कारभार कसा करणार, दोन लाखापर्यंतचे अधिकार खालच्या अधिकाऱयांना द्या, सत्ता परिवर्तन झाली आहे याचे भान ठेवा. शौचालय बांधून तीन महिने झाले ती बंदच आहेत. गॅस दाहिनेच्या कामाचे दोन वर्ष झाले टेंडर काढून वर्कऑर्डर का दिली नाही. टेबलावर आलेल्या फाईलीला दिरंगाई नको, आंबडेकर उद्यान कामाची फाईल आयुक्तांच्या टेबलावरून गायब झाली आहे. बजेटला तरतुद असताना का मंजुरी दिली नाही. नगरसेवक गेले तरी चालेल पण आम्ही आत्ता गप्प बसणार नाही. कामे करणार नसाल तर तुम्ही घरी जाल किंवा आम्ही घरी जावू असा इशाराही यावेळी देवमाने यांनी दिला. सुरेश आवटी म्हणाले, आयुक्तांच्या माहितीत मोठी तफावत लोकांनी कामासाठी निवडून दिले. कमिटी आली की नंबर मिळतो, नंतर काहीही होत नाही.

प्रशासनाची कामे प्रशासनाने करावीत : दिगडे

नगरसेविका भारती दिगडे म्हणाल्या, प्रशासनानचे कागदावर कामकाज दिसते पण ते प्रत्यक्षात आहे का हा खरा प्रश्न आहे. आगामी तीन महिन्यात नागरी सोयी सुविधांची कामे मार्गी लागली पाहिजेत. डॉग पाईंट करण्याचे काय झाले. नगरसेवकांचे काम धोरणात्मक निर्णय घेण्याचे आहे. प्रभागातील नागरी सुविधा देण्याचे त्यावर लक्ष ठेवून ते मार्गी लावण्याच्sा काम प्रशासनाचे आहे. त्यामुळे नगरसेवकांचा वेळ या कामात नको, यासाठी प्रशासनाला जागे करून कामाला लावावे. तरच कामे होतील.

…तर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन

 नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे यांनी प्रशासनाच्या कामकाजाचा पंचनामा करताना त्या म्हणाल्या, कामे गतीने झाली पाहिजेत यामध्ये दिरंगाई नको, मागे एचसीएलमध्ये मोठा घोटाळा झाला यामध्ये कोणतीही कारवाई झाली नाही. प्रतापसिंह उदयानाचे काम रेंगाळली आहे. अनेक कामे प्रलंबित आहेत. अधिकारी मात्र उडावाउडवीची उत्तरे देतात. यापुढे असे चालणार नाही. प्रशासन अशाच प्रकारे वागले तर या विरोधात आवाज उठविला जाईल.

भ्रष्टाचार करणाऱयांना घरी घालवा

मुन्ना कुरणे म्हणाले, मनपातील मागील सत्ताधाऱयांनी भ्रष्ट कारभार केल्यानेच जनतेने यावेळी भाजपाला सत्ता दिली आहे. त्यामुळे यापुढे पारदर्शी आणि गतीमान कारभार झाला पाहिजे. वजन ठेवल्याशिवाय, फाईल मार्गी लागत नाहीत. ते थांबले पाहिजे. विनाविलंब फाईली गेल्या पाहिजेत. लाचलुचपतची कारवाई झालेल्या अधिकाऱयांना महत्वाच्या विभागात ठेवले आहे. मागील सत्ताधाऱयांनी भ्रष्टाचार केला त्यातील एकाही प्रकरणात कारवाई केली नाही. शेतकरी बँकेत कोटय़वधी रूपये अडकले, खुले भुखंड मूळ मालकांना विकले. अनेक घोटाळे झाले त्यावर कारवाई नाही. भ्रष्ट कारभार करणाऱयांना घरी घालवा. यावेळी लक्ष्मण नवलाई म्हणाले, प्रशासनाने विश्वासात घेऊन काम करावे. अनारकली कुरणे म्हणाल्या, मागील सत्ताधाऱयांनी जनेतची कामे केली नसल्याने भाजपाला सत्ता दिली आहे. कामे होणार नसतील मग दोन्ही सत्तेत काय फरक, नगरसेवकांना कामाच्या फाईल घेऊन फिरावे लागते ते बंद झाले पाहिजे. सुब्ा्राव मद्रासी म्हणाले, कृष्णानदीत चार ठिकाणाहुन सांडपणी मिसळते, त्याचा बंदोबस्त करावा, याशिवाय नाल्याची सफाई केल्यास शामरावनगरमध्ये पावसाळयात साठणाऱया पाण्याचा निचरा होइंल.

मुलभूत सुविधा पुरवा : इनामदार

कोअर कमिटीचे सदस्य शेखर इनामदार म्हणाले, आढावा सभेत सदस्य मुलभूत प्रश्नावर आक्रमक आहेत. या गोष्टींकडेच लक्ष दिले पाहिजे. स्वच्छ सर्व्हेक्षणात मनपाचा 119 वा नंबर कसा आला. पण, वस्तुस्थिती वेगळी आहे. पाणी, वीज स्वच्छता, हे महत्वाचे आहे. याकडेच गांभिर्याने लक्ष द्यावे, पावसाने अनेक भागात जाता येत नाही. उपायोजना महत्त्वाची आहे. मोठय़ा योजना होतील. पण प्रभागातील प्रश्न महत्वाचे आहेत. निवडून आल्यानंतर पहिला हार घातला. आता लोक दुसरा हार घालतील. त्यामुळे आगामी तीन महिन्यात मुलभूत सोयीसुविधा देण्याला प्राधान्य द्यावे.