|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्रगतीच्या वाटा शोधताना समाजहित जोपासा

प्रगतीच्या वाटा शोधताना समाजहित जोपासा 

प्रतिनिधी/ खंडाळा

आपल्या गावपातळीवर भौतिक सुविधांची पुर्तता झाली असली तरी यापुढे प्रगतीच्या वाटा शोधताना समाजहित जोपासावे. आम्ही प्रशासन म्हणून तुमच्या बरोबर आहोत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पळशी येथे केले.

तालुक्यातील पळशी येथील कै. लक्ष्मणराव भरगुडे पाटील सांस्कृतिक भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्यावतीने अटल महापणन अभियान अंर्तगत उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण व शितकरण केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते करण्यात आला.

सावित्रीबाईंचा आदर्श घ्या

यावेळी जिल्हाधिकारी सिंघल म्हणाल्या,  सामाजिक परिवर्तन झाले आहे. महिला – मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहणे आवश्यक असून तुम्ही कशातही कमी नाही. स्वयंरोजगार योजना असतात. आर्थिक सक्षम होण्यासाठी लघुउद्योग सुरु करावेत. बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी. मुलींना शिकू द्या, त्या म्हातारपणी तुमचा आधार बनतील. सर्वांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श मानून वाटचाल केली पाहिजे.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितिन भरगुडे-पाटील, माजी सभापती आनंदराव पाटील, खंडाळ्याच्या नगराध्यक्षा लताताई नरुटे, अनुप सूर्यवंशी, प्रा. भरत गाढवे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, प्रांतअधिकारी संगीता चौगुले, तहसिलदार विवेक जाधव, गटविकास अधिकारी दिपा बापट, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक निबंधक नानासो रुपनवर, चेअरमन प्रकाश भरगुडे, सरपंच अमोल भरगुडे, उपसरपंच कल्पना चव्हाण, प्रकाश दडगे, सचिव नितिन साळी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट कासुर्डे यांनी केले. तर उपस्थितांचे भरगुडे – पाटील यांनी आभार मानले.

Related posts: