|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » स्वच्छता समितीकडून देशमुखनगरची पाहणी

स्वच्छता समितीकडून देशमुखनगरची पाहणी 

वार्ताहर / देशमुखनगर

ग्रामीण स्वच्छता सर्व्हेक्षणच्या अंतर्गत देशमुखनगर (ता.सातारा) येथे नुकतीच केंद्रीय स्तरावरील स्वछता समितीने भेट दिली.

ग्रामीण स्वच्छता सर्व्हेक्षण मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाची समिती पाहणी करण्यासाठी नुकतीच सातारा जिह्यात आली होती. केंद्राच्या या योजनेअंतर्गत सातारा तालुक्यातून देशमुखनगर या एकमेव गावाच्या पाहणीसाठी नुकतीच निवड झाली होती. सुरज जगदाळे यांच्या केंद्रीय स्वच्छता समितीने गावातील स्वछता, परिसर पाहणी, अंगणवाडी, शाळा, आरोग्य केंद्र तसेच ग्रामदूतांच्या माध्यमातून स्वछतेबाबत चर्चा केली. त्याचबरोबर ग्रामस्थांशीही संवाद साधला. 

निर्मलग्राम पुरस्कृत देशमुखनगरची या स्पर्धेसाठी केंद्रस्तरावर रॉडमनुसार सातारा तालुक्यात एकमेव निवड झाली आहे, स्वच्छतेविषयी देशमुखनगर गावाने सातत्य राखले आहे, 255 एवढी लोकसंख्या असलेल्या गावात घरटी तसेच जि. प शाळेत, अंगनवाडीत स्वतंत्र शौचालये असून त्यांनी सांडपाण्यासाठी परसबागा तयार केल्यामुळे सांडपाण्याचा अन्यत्र प्रादूर्भाव नसल्याने पेंद्रीय स्वच्छता सर्वेक्षणाच्या स्पर्धेत निश्चित यश संपादन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 या समितीबरोबर सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, सातारा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कारखानीस, विस्तार अधिकारी वसंत धनावडे, तालुका समन्वयक अमित गायकवाड, एच. सी. बदडे, प्रियांका देशमुख आदी उपस्थित होते.

या समितीचे स्वागत सरपंच भारती मर्ढेकर, ग्रामसेवक एन. ए. शिंदे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, युवा मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थे उपस्थित होते.