|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिरवळ-बारामती’चा प्रश्न लवकरच मार्गी-आ. पाटील

शिरवळ-बारामती’चा प्रश्न लवकरच मार्गी-आ. पाटील 

वार्ताहर/ अंदोरी

तालुक्यातील रखडलेली अनेक विकासकामे मी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असून वाघोशीपर्यंत नीरा देवघरचे पाणी आणण्यात आपल्याला यश आले असून अनेक दिवसांपासून रखडलेला शिरवळ – बारामती चार पदरीकरणाचा प्रश्न देखील मी लवकरच मार्गी लावणार आहे. असे प्रतिपादन वाई खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी केले. ते मरीआईचीवाडी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
 यावेळी दत्तानाना ढमाळ, कृषी सभापती मनोज पवार, जि. प सदस्या दिपाली साळुंखे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र तांबे, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक शंकरराव क्षीरसागर, ऍड सुभाष घाडगे, योगेश क्षीरसागर, संभाजी घाडगे, किसन ननावरे, धनाजी अहिरेकर, भिकु रासकर, संजय जाधव, सुधाकर होवाळ, मोहन कराडे, सुरेश रासकर आदींची उपस्थिती होती,

 यावेळी पुढे बोलताना आमदार  म्हणाले मरीआईचीवाडीतील राहिलेली  विकासकामे आगामी काळात मार्गी लावणार आहे. विधानसभा निवडणुकीवेळी खंडाळा तालुक्याने मला भरघोस सहकार्य केले आहे.  

यावेळी दत्तानाना ढमाळ, मनोज पवार, दिपाली साळुंखे यांची भाषणे झाली. यावेळी भिकोबा राऊत, महादेव खताळ, सुनिता कुचेकर, प्रिती रासकर, वैशाली खताळ, सीमा रासकर, शेखर धोमकर, गणपत शिंदे, राजेद्र रासकर, संतोष रासकर, सुर्यकांत रासकर, रामचंद्र रासकर, मिथुन यादव, सागर खताळ, दिलीप कापरे, ग्रामसेवक विलास माने आदी उपस्थित होते.