|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे

खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे 

शहर प्रतिनिधी/ फलटण

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल फलटण येथील माजी जेष्ठ खो-खो खेळाडुंच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यात  खो-खो या क्रीडा क्षेत्रात फलटणच्या खेळाडूंनी सातत्यपुर्वक चमकदार कामगिरी केलेली आहे. आजही फलटण येथील खेळाडूंचा खो-खोमध्ये दबदबा कायम आहे. मध्यंतरी संजीवराजे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे राज्यस्तरीय खाöखो स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. संजीवराजे यांच्या निवडीमुळे तालुक्यातील खेळाडूंना अधिक बळ मिळाले आहे. अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया यावेळी जेष्ठ खेळाडूंमधून उमटत होत्या. क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱया संजीवराजेंना राज्य अध्यक्षपद मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे. यावेळी माजी राष्ट्रीय खेळाडू प्रल्हाद भोईटे, सुदामराव मांढरे, आप्पसाहेब पवार, प्रतापराव नाईक निंबाळकर, हरिश्चंद्र काटकर, रतन नाईक निंबाळकर, तानाजी फडतरे, शरदराव कदम, अनिलराव पोटे, आबासो पवार, विनायक देशपांडे, शिवाजीराव शिंदे, टि. डी. शिंदे, राजू.ग. पवार, विजय खलाटे, नानासोहब निंबाळकर, रविंद्र गांधी, संजय पवार, बाळासाहेब चोरमले, सुधीर निकम, मिलिंद सहस्त्रबुध्दे, जयवंत कदम, बाबा निंबाळकर, सुनिल गंगतीरे, रामभाऊ चोरमले आदी जेष्ठ खेळाडू व मान्यवर उपस्थीत होते.

Related posts: