|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » भंपक सरकारला कायमचे घरी घालवा

भंपक सरकारला कायमचे घरी घालवा 

वार्ताहर/ खटाव

शासनाच्या चूकीच्या धोरणामुळे बेरोजगारी वाढली आहे. तसेच सरकारच्या व्यापारी वृत्तीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. देश ठरावीक लोकांच्या हातात गेल्यामुळे सार्वभौमत्वाला धोका पोहचला असल्याने अशा भंपक सरकारला कायमचे घालवावे लागेल असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

        खटाव (ता.खटाव) येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी माजी आ. प्रभाकर घार्गे, जि.प सदस्य प्रदिप विधाते, सरपंच रत्नप्रभा घाडगे, बाळासाहेब इंगळे, उपसभापती संतोष साळुंखे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, बाजार समिती संचालक राजेन्द्र कचरे, उंबरमळे सरपंच नवनाथ वलेकर, जाखणगावचे उपसरपंच जितेंद्र शिंदे, उपसरपंच बबनराव घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.                          शशिकांत शिंदे म्हणाले, शासनाच्या नाकर्तेपणामुळे सामान्य जनता भरडली जात आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. स्वस्त धान्य मिळत नाही. जलआराखडय़ात जिहे-कटापूर योजना मंजूर झाली पण निधी मात्र मिळत नाही. त्यामुळे देशात अशांतता आहे. नोटाबंदी फसली असल्याने त्याचा फटका सामान्य जनतेला बसला आहे. 

        मा.आ. प्रभाकर घार्गे यांनी खटाव चुकीच्या विचारांची पाठराखण करणार नसल्याचे सांगत भविष्यातही विविध विकास कामे मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली. तर खटाव येथे लवकरच शेतक-यांना उपयोगी असा बझार सुरू करणार असल्याचे सांगितले.

          जि.प सदस्य प्रदिप विधाते म्हणाले, खटाव मध्ये राष्ट्रवादीने दिलेल्या पाठबळामुळे विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. खटावला जोडणा-या रस्त्यांचा प्रश्न सुटला आहे. तसेच येरळा नदीवरील फरशी पुलाची उंची वाढवण्याचे काम व्हावे अशी मागणी विधाते यांनी केली.

          यावेळी उपसभापती संतोष साळुंखे व उपसरपंच जितेंद्र शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.   

       यावेळी माजी सरपंच सुवर्णा पवार, मनोज देशमुख, किशोर डंगारे, रशिद शिकलगार, दिलीप जाधव, मुगूटराव पवार, किरण राऊत, आप्पा शिंदे, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts: