|Friday, September 21, 2018
You are here: Home » Top News » कोलकाता येथील माजेरहाट पूल कोसळला

कोलकाता येथील माजेरहाट पूल कोसळला 

ऑनलाईन टीम / कोलकाता

पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोतकाता येथे पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. दक्षिण कोलकातामधील तारताला परिसरातील माजरहाट पूल कोसळला आहे. या दुर्घटनेमुळे अनेकजण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा पूल सुमारे 60 वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत असून, दुर्घटनेत सहा जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

दरम्यान, मदत आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगाऱयाखाली काही माणसं अडकल्याची शक्मयता विचारात घेऊन मोठय़ा प्रमाणात रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. तसेच अपघातस्थळापासून जवळच लष्कराची छावणी असून, तेथूनही मदत मागवण्यात आली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी या दुर्घटनेत पुलाखाली आठ ते दहा जण दबल्याचा अंदाज वर्तवला आहे.

 

Related posts: