|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » माणगावमध्ये संशयस्पद स्फोटके जप्त

माणगावमध्ये संशयस्पद स्फोटके जप्त 

ढालघर येथील युवकाला अटक

50 हजारांचे साहीत्य जप्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कसून चौकशी

प्रतिनिधी /महाड

रायगड जिह्यांतील माणगाव तालुक्यामध्ये मुंबई गोवा महामार्गालगतच्या ढालघर येथे स्फोटके जप्त करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर सापडलेल्या या स्फोटाकांमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मोहमद उमर जहिर काझी (48, रा. ढालघर फाटा, माणगाव) याला बेकायदेशीर स्फोटके बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. 2 सप्टेंबर रोजी सध्यांकाळी हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत माणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहमद उमर जहिर काझी याच्या घरातून संशयास्पद स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये 48 हजार 250 रुपये किमतीच्या 965 ई.डि.पी कॅप, 2 हजार 300 रुपयांच्या 46 कांडय़ा आदी सुमारे 50 हजार किमतीचे स्फोटक साहीत्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी काझी याच्यावर स्फोटक पदार्थ अधिनियम 1908, 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यांत आला. पोलिसांनी स्फोटके जप्त केली असून आरोपीला अटक करण्यांत आली आहे.

हे साहीत्य सुरंग स्फोटासाठी वापरले जाते. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर मोठय़ा प्रमाणात हे स्फोटक साहीत्य सापडल्याने खबरदारी म्हणून कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणी पुढील तपास माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विक्रम जगताप करीत आहेत.

Related posts: