|Monday, April 22, 2019
You are here: Home » उद्योग » युपीआय व्यवहार 30 कोटींच्या पुढे

युपीआय व्यवहार 30 कोटींच्या पुढे 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

नॅशनल पेमेंट्स कॉपोर्रेशन ऑफ इंडिया(एनपीसीआय)युनियन पेमेट्स इंटरफेस (युपीआय)याच्या मार्फत करण्यात आलेल्या बँक ते बँक खात्याची सेटलमेंट करण्याची प्रक्रीया चालू आहे. या अंतर्गत करण्यात आलेल्या व्यवहारांचा आकडा 30 कोटी महिन्याला 30 कोटी पर्यत पोहोचला आहे. अशी माहिती एनपीसीआय च्या अहवालातून देण्यात आली आहे.

ऑगस्टमध्ये 31.2 कोटी व्यवहार करण्यात आले आहेत. तर जुलैमध्ये 23.56 कोटी व्यवहारात झालेत तर यांची एकूण टक्केवारीत 32 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. बँकांकडून सांगण्यात आले आहे कि युपीआय व्यवहार करण्यातकडे नागरिकांचा ओढा वाढत तर मागील वर्षात सप्टेबरमध्ये 3 कोटी युपीआय व्यवहार करण्यात आले होते यात 5 हजार 293 कोटी रुपये  रक्कमेची देवाण घेवाण केल्याचे सांगण्यात आले आहे. तर यदा ऑगस्टमध्ये 54 हजार कोटी रुपयाची देवाण घेवाण करण्यात आल्याचे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले.

एप्रिल ते जून या कालावाधीत आयएमपीएसचा वापर करुन करण्यात आलेल्या व्यवहारातील रक्कम जवळपास 10 हजार रुपयापर्यत होती. अशी माहिती आरबीआयकडून सादर करण्यात आलेल्या अहवालातून सांगण्यात आले आहे. भारतात मोठय़ा कंपन्या आणि इतर सरकारी स्टार्टअप इंडियासारख्या योजनाच्या माध्यमातून युपीआय व्यवहारात वाढ होऊन बाजारातील व्यवहारात वेगळे स्थान निर्माण करण्यात आले आहे.

युपीआयची मदत घेऊन पीयर टू पीयर पेमेन्टस करण्यासाठी व्यक्ती ते व्यापार असा व्यवहाराचा मार्ग चालू राहिला आहे. यात मोठय़ा प्रमाणात विस्तार होणार असल्याचे मत एनपीसीआयचे मुख्य अधिकारी दिलीप अस्बे यांनी मांडले आहे.

Related posts: