|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कर्नाळमध्ये एक गाव एक गणपती

कर्नाळमध्ये एक गाव एक गणपती 

सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय

प्रतिनिधी/ सांगली

गतवर्षी पोलीस बंदोबस्ताविना गणेशोत्सव साजरा करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या मिरज तालुक्यातील कर्नाळ गावाने यावर्षी एक गाव एक गणपतीचा निर्णय घेतला आहे. शिवाय अनावश्यक खर्चाला फाटा देवून मिळणाऱया लोकवर्गणीतून गावात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र आणि लहान मुलांच्यासाठी खेळण्यांचे साहित्य खरेदी करण्याचाही निर्णय घेतला आहे.

जिल्हा प्रशासन आणि पोलीसांच्या आवाहनास प्रतिसाद देत कार्नाळमधील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व पक्षीय नेतेमंडळींनी एकत्र येत चालूवर्षी गावात एक गाव एक गणपती बसविण्याचा याशिवाय डॉल्बीला फाटा देवून पारंपारिक वाद्यांना पसंती देण्याबरोबरच देखाव्यासाठी अनावश्यक खर्च न करता सजीव देखावे करण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला. तसेच गावात उत्सवासाठी जमा होणाऱया लोकवर्गनीतून गावातील विद्यार्थ्यांच्यासाठी स्पर्धापरिक्षा मार्गदर्शन केंद्र आणि लहान मुलांना व्यायामाची आणि खेळाची आवाड निर्माण व्हावी यासाठी खेळणी खरेदी करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र डोंगरे, पोलीस उपनिरिक्षक रत्नदीप सांळुखे आदींच्या मार्गदर्शनामुळे गावाने एक गाव एक गणपतीचा निर्णय घेतला. तसे निवेदन ग्रामस्थ आणि मंडळाच्या पदाधिकाऱयांच्यावतीने पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर यांना देण्यात आले. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजीराव पाटील, पोलीस पाटील सौ. शुभांगी पाटील, माजी उपसभापती पै. राजेश एडके, पै. विष्णू पाटील, उदयसिंह कदम, उत्तम पाटील, सुधाकर माने, गजानन पाटील, सचिन औताडे, विकास पाटील, मधुकर जाधव, यशवंत पाटील, सचिन पाटील आदीसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.