|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वाळकी येथील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

वाळकी येथील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू 

वार्ताहर/ पट्टणकुडी

वाळकी (ता. चिकोडी) येथील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. काकासाहेब नानासाहेब पाटील (वय 32) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, वाळकी येथील रहिवासी असलेले काकासाहेब हे गत 15 वर्षापूर्वी भारतीय सैन्य दलामध्ये दाखल झाले होते. सध्या राजस्थानमध्ये सेवा बजावत होते. मंगळवारी त्यांना हृदयविकाराचा त्रास झाल्याने दिल्ली येथील आर. आर. रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव वाळकीत दाखल होणार असल्याचे समजते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. येत्या काही महिन्यामध्येच ते सेवानिवृत्त होणार होते. अतिशय मनमिळाऊ व मार्गदर्शन करणारा त्यांचा स्वभाव होता. या घटनेमुळे वाळकी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Related posts: