|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आता प्रतिक्षा केवळ निवडणूकीच्या घोषणेची

आता प्रतिक्षा केवळ निवडणूकीच्या घोषणेची 

प्रतिनिधी/ बेळगाव

   मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांचा निकाला जाहीर झाला आहे.यापुर्वीच वॉर्डनिहाय आरक्षण निश्चित केले आहे. तसेच नगरविकास खात्याने महापौर-उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर केले आहे. महापालिका निवडणूका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने पुर्ण केली आहे. यामुळे आता केवळ निवडणूकांच्या घोषणेची प्रतिक्षा आहे.

  राज्यातील 10 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक नुकताच पार पडल्या आहेत. दुसऱया टप्यात उर्वरीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घेण्याची शक्मयता आहे. यादृष्टीने नगरविकास खात्याने तयारी चालविली आहे. बेळगाव महापालिका सभागृहाची मुदत फेब्रुवारीमध्ये संपणार आहे. पण त्यापुर्वीच निवडणूक घेण्याची तयारी नगरविकास खात्याने केली आहे. वॉर्ड पुनर्रचना मागील वर्षी करण्यात आली होती. मागील महिन्यात वॉर्डनिहाय अंतिम आरक्षण आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील अन्य महापालिका व नगरपालिकांच्या महापौर-उपमहापौर पदाचे आरक्षण नगरविकास खात्याने जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अकरा महापालिकांच्या महापौर-उपमहापौर पदाचे आरक्षण दि. 3 सप्टेबर रोजी जाहीर केले आहे. महापालिका निवडणूक घेण्याच्यादृष्टीने वॉर्ड रचना, वॉर्डनिहाय आरक्षण आणि महापौर-उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आल्याने महापालिका निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता केवळ महापालिका निवडणूकीच्या घोषणेकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

  नगरविकास खात्याने 2018-19 कालावधीकरिता बेळगाव महापौर-उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर केले आहे. महापौर पद ‘सामान्य महिला’ आणि उपमहापौर ‘मागास(ब) महिला’करिता राखीव ठेवण्यात आले आहे. महापालिकेची निवडणूक होण्यापुर्वीच 2018-19 या कार्यकालावधीकरिता आरक्षण जाहीर झाले असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. पण मुदत पुर्ण होण्यापुर्वीच महापालिका निवडणूका होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. डिसेंबरपुर्वी निवडणूका घेण्याच्यादृष्टीने निवडणूक विभागाने तयारी चालविली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.  निवडणूका घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. यामुळे निवडणूकीची घोषणा कोणत्याही होण्याची शक्मयता आहे.

  यापुर्वी 2016-17 मध्ये महापौर ‘सामान्य महिले’करिता राखीव होते. उपमहापौर सध्याच्या सभागृहात ‘मागास-ब महिलेकरिता महापौर-उपमहापौर पदाची संधी मिळाली नाही. मात्र आगामी सभागृहात उपमहापौरपद मागास-ब महिलेकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. यामुळे आगामी सभागृहात महापौर-उमहापौर पदावर महिलांची वर्णी लागणार आहे.

  महापालिका निवडणूक मार्च 2013 मध्ये झाली होती. पण महापौर-उपमहापौरपदाच्या आरक्षणामुळे काही नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतली होती. परिणामी महापौर-उमहापौर निवडणूकीस एक वर्ष विलंब झाला होता. यामुळे नगरविकास खात्याने खबरदारी घेतली असून निवडणूका होण्यापुर्वीच महापौर-उपमहापौर पदाच्या आरक्षणाची घोषणा केली आहे. न्यायालयात धाव घेवू नये याकरिता निवडणूक होण्यापुर्वीच आरक्षणाची घोषणा करण्याची शक्कल नगरविकास खात्याने लढविली आहे.