|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पंढरीचे वाळवंट म्हणजे पुरोगामी समाजाचे चित्र

पंढरीचे वाळवंट म्हणजे पुरोगामी समाजाचे चित्र 

बेळगाव / प्रतिनिधी

जाती, धर्म किंवा पंथ न पाहता फक्त भक्ती हा एकच पंथ वारकरी संप्रदायात पाहिला जातो. हा संप्रदाय कोणत्याही बाबा किंवा बुवाचा नाही तर तो पंढरीच्या विठ्ठलाचा आहे. आज आपण पुरोगामी समाज व्यवस्थेविषयी बोलतो परंतु ही पुरोगामी व्यवस्था पहायची असेल तर पंढरीचे वाळवंट हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे अवघे विश्वची माझे घर म्हणणारा हा जगातला पहिलाच संप्रदाय असल्याचे प्रतिपादन आळंदी येथील हभप ज्ञानेश्वर वाबळे माऊली यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी हभप वाबळे माऊली मार्गदर्शन करीत होते. त्यांनी ‘संतांचे सामाजिक योगदान’ या विषयावर मार्गदर्शन करत वारकरी संप्रदाय हा इतर संप्रदायांपेक्षा किती समृद्ध आहे, हे विविध उदाहणांद्वारे श्रोत्यांसमोर मांडले. कर्मकांड व बुवाबाजीवर तर आपल्या प्रखर शब्दांनी हल्ला चढविला.

 वाचनालयाच्या अध्यक्षा सुनिता मोहिते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड नागेश सातेरी यांनी केले. तर कृष्णा शहापूरकर यांनी आभार मानले. यावेळी वाचनालयाचे पदाधिकारी आय. जी. मुचंडी, गोविंद राऊत, नेताजी जाधव, अनंत लाड यासह इतर सदस्य व श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

Related posts: