|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » Top News » वाहनाच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / नवी मुंबई :

पनवेलमुंब्रा मार्गावर तळोजा एमआयडीसीमध्ये वाहतूक कोंडी सोडवताना पोलीस कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अतुल घागरे असे वाहतूक पोलीस कर्मचाऱयाचे नाव आहे. सकाळी पाचच्या सुमारास तळोजा एमआयडीसीमध्ये वाहतूक व्यवस्था पाहत असताना एका अज्ञात वाहनाने घागरे यांना धडक दिली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा भागात मोठय़ा प्रमाणात कारखाने असल्याने इथे अवजड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणावर होत असते. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी वाढत असून या भागात वाहतूक पोलिसांचे संख्याबळ वाढवण्याची मागणी पोलीस कर्मचाऱयांकडून करण्यात आली होती. मात्र याची दखल न घेतल्यामुळेच घागरे यांना जीव गमवावा लागल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. घागरे यांच्या पत्नी रबाळे पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. दुर्दैव म्हणजे मुलीच्या वाढदिवशीच घागरे यांना मृत्यूने गाठल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे

Related posts: