|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » वीज कंत्राटी कामगार संघाचे पुण्यात त्रैवार्षिक अधिवेशन राज्यभरातील कामगारांची उपस्थिती

वीज कंत्राटी कामगार संघाचे पुण्यात त्रैवार्षिक अधिवेशन राज्यभरातील कामगारांची उपस्थिती 

ऑनलाईन टीम / पुणे

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे चौथे त्रैवार्षिक अधिवेशन 7 सप्टेंबर रोजी पुण्यात होणार आहे. यामध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीत कार्यरत असलेले राज्यभरातील वीज कंत्राटी कामगार उपस्थित रहाणार आहेत.

वीज उद्योगातील कामगारांना समान काम वेतन मिळावे, कंत्राटदारांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी पूर्वाश्रमीच्या एमएसईबीमधील रोजंदारी कामगार पद्धत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी कामगार संघातर्फे करण्यात आली आहे. यासाठी न्यायालयीन लढा सुरू असल्याचे संघाचे सचिन मेंगाळे, निलेश खरात यांनी सांगितले. या अधिवेशनाचे उद्घाटन राज्य ऊर्जामंत्री चंद्रशाखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षा आमदार मेधा कुलकर्णी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार प्रमुख मार्गदर्शक आहेत.