|Thursday, July 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » चुंबन घेता येतो परिमळू

चुंबन घेता येतो परिमळू 

संतांचा आजही जयजयकार होतो. कारण त्यांच्या शरीरव्रजामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांनी पाऊलही ठेवले नव्हते. त्यांनी आपल्या शरीर आणि हृदयाला व्रज बनवून टाकले होते. मोठमोठय़ा सम्राटांना जग विसरून जाईल, परंतु जनाबाई, मीराबाई, नामदेवराय, एकनाथ, तुकोबा, नरसिंह मेहता, सुरदास यांना कोण विसरू शकेल? गोपी म्हणतात-कान्हा! आम्ही तर केवळ तुझ्यासाठीच जगत आहोत. तुझ्याविना काळ आम्हाला त्रास देतो, सतावतो. नाथ! तशी तर आम्हाला कशाचीच गरज नाही, पण शरणागताचे रक्षण करणे तुझे कर्तव्य नाही का? तुला तशी गरज वाटत नाही का? शरणागत जीवाची उपेक्षा करू नकोस. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकात आम्ही तुलाच शोधीत असतो. (भक्त सर्वांमध्ये एका ईश्वरालाच शोधत असतो. सगळय़ातच जो ईश्वराला शोधील तोच गोपी.) हे नाथ! आम्ही आपल्या दासी आहोत, आपल्याच आहोत. आम्हाला दर्शन देऊन कृपा करा. हे नाथ! आपण अजामीळासारख्या पाप्यावरसुद्धा कृपा केली होती, तर मग काय आमच्यावर आपण कृपा करणार नाही? आम्हाला दर्शन देणार नाही काय? हे नाथ! आपले चिंतन करीत या अंधाऱया रात्री आम्ही वनात भटकत राहिलो आहोत. आमची उपेक्षा करणे आपल्याला शोभा देत नाही. हे नाथ! आम्ही आणखी तर काहीच मागत नाही. आम्ही तर आपल्या निरपेक्ष दासी आहोत. आमची भक्ती निष्काम भक्ती आहे. आपल्या नेत्रांनी आम्ही विद्ध झालो आहोत. नेत्रबाणांनी केलेला हा वधच तर आहे! आम्हाला आता कळले की आपण दयाळू नाही. नि÷tर आहात. यशोदा भोळी आहे. तिचा एकही सद्गुण आपणात आलेला नाही. म्हणून आपण आम्हाला तळमळत ठेवत आहात यात काहीच आश्चर्य नाही. गोपी म्हणतात-कृष्णा! तू लोणीचोर आहेस. आमची मने सुद्धा तू चोरली आहेस आणि आता आम्हाला दूर करू इच्छित आहेस! कन्हैया म्हणतो-मी तर चोर आहे. मग मला का हाका मारता आहात? चोराशी कोणी मैत्री करतात का? गोपी म्हणतात-चोरी करण्यासाठीच तर आम्ही तुला हाक मारीत आहोत. तू चोरी करतोसच. तुझे डोळेही चोर आहेत. कृष्णाची चोरी, त्याला गोपींनी चोरी करताना पकडणे, त्याला शिक्षा करणे तरीही त्याने आपल्या घरी पुनः पुन्हा चोरी करावी असे गोपींना वाटणे हे सारेच विलक्षण आहे. हे वर्तन तुमच्या आमच्या मोजमापात मावणारे नाही. नामदेवरायांनी एका गोड अभंगात केलेले वर्णन पहा-एक गवळण यशोदेकडे कृष्णाविषयी तक्रार घेऊन येते  गवळण जसवंती पैं सांगे । आलें या कृष्णाचेनि मागे । येणें येणें वो श्रीरंगें । नवनीत माझें भक्षिलें ।। एक्मयाहातीं लोण्याचा कवळू । मुख माखिलें आळूमाळू । चुंबन घेता येतो परिमळू । नवनीताचा गे सये ।।

चोरी करणाऱया कृष्णाला मी रंगेहाथ पकडले आणि काय केले? तर त्याचे चुंबन घेतले!

      Ad.  देवदत्त परुळेक