|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » उसप येथील सहा संशयित निर्दोष

उसप येथील सहा संशयित निर्दोष 

बंदुकीच्या सहाय्याने जीवे मारण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी / ओरोस:

बंदुकीच्या सहाय्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखालील दोडामार्ग तालुक्यातील उसप येथील गणेश गवस, सुनील गवस, चंद्रकांत नाईक, जि. प. माजी सदस्य चंद्रकांत मळीक, पं. स. सदस्य लक्ष्मण नाईक, रामकृष्ण गवस या सहाही संशयितांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयितांच्यावतीने ऍड. संग्राम देसाई, ऍड. अविनाश परब, ऍड. सुहास साटम यांनी काम पाहिले.

17 मार्च 2011 रोजी मोटारसायकलवरून घरी जात असताना उसप मराठी शाळा येथे गैरकायदा जमाव करून काहीजणांनी बंदुकीचा बार उडवला होता. यातील छरे आपल्याला लागून दुखापत झाली. त्यामुळे संबंधितांचा आपल्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न होता, अशी तक्रार उसप केळीचे टेंब येथील प्रकाश गवस यांनी पोलिसांत दिली होती.

याप्रकरणी संशयितांवर भादंवि कलम 307, 143, 147, 148, 149 आणि हत्यार अधिनियम 3/25 (1) (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा व सत्र न्यायालयात चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीत आरोपींविरुद्ध कोणताही सबळ पुरावा न्यायालयासमोर येऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.