|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सौदी अरेबिया सरकारची थट्टा केल्यास तुरुंगवास

सौदी अरेबिया सरकारची थट्टा केल्यास तुरुंगवास 

रियाध

 सौदी अरेबियात आता समाजमाध्यमांवर थट्टा उडविणे किंवा सरकारवर टीका करणे लोकांना चांगलेच महागात पडू शकते. ऑनलाईन चेष्टामस्करीद्वारे सार्वजनिक व्यवस्थेला नुकसान पोहोचविणारे शिक्षेस पात्र ठरतील, या गुन्हय़ासाठी आरोपीला दंडासोबतच 5 वर्षांचा तुरुंगवास ठोठावला जाणार असल्याचे सौदी अरेबियाने म्हटले आहे. सार्वजनिक व्यवस्था आणि धार्मिक मूल्यांची थट्टा उडविणाऱया समाजमाध्यमांवरील टिप्पणींना सायबर गुन्हा मानण्यात येणार आहे. त्याचबरोबर या गुन्हय़ासाठी आरोपीला 5 वर्षांची शिक्षा आणि 8 लाख डॉलर्सचा दंड देखील भरावा लागेल, असे सौदी अरेबियाने जाहीर पेले.

सौदी सरकारचा हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी धोक्याचा असल्याचा भीती अनेक जण व्यक्त करत आहेत. सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद यांच्या संघटना आणि अनुयायांनी मानवाधिकार कार्यकर्त्यांना लक्ष्य केले आहे. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय समुदायाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.