|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नापिकीस कंटाळून शेतकरी दांपत्याची आत्महत्त्या

नापिकीस कंटाळून शेतकरी दांपत्याची आत्महत्त्या 

वार्ताहर/ कळंब

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला वैतागून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कळंब तालुक्यातील आढाळा येथे मंगळवारी सकाळी निदर्शनास आली. दहा दिवसापूर्वीच ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी तालुक्यातील डिकसळ येथील शेतकऱयाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा शेतकरी दांपत्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्याने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

 आढाळा येथील शिवाजी अंबादास वायसे (वय55) हे बहुला रस्त्यावरील स्वतःच्या शेतात पत्नीसह वास्तव्यास होते. सोमवारी सायंकाळी गावातील हरीनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यातील भजनाच्या कार्यक्रमात हजेरी लावून रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शेतातील घरी गेल्sा. मध्यरात्री घराजवळील जांभळीच्या झाडास शिवाजी वायसे यांनी तर तेथून जवळच असलेल्या लिंबाच्या झाडास त्यांची पत्नी धोंडूबाई शिवाजी वायसे (वय50) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

   मंगळवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. मयत वायसे दांपत्याच्या नावे दोन हेक्टर 50 गुंठे जमीन असून बँक ऑफ इंडियाचे एक लाख रूपयाचे कर्ज आहे. कर्जबाजारीपणा व नापिकीमुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा वायसे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, मयत शेतकरी दांपत्यावर इटकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.

  घटनेचा कळंब पोलीस व तलाठी यांनी पंचनामा केला. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची करण्यात आली आहे.