|Sunday, November 18, 2018
You are here: Home » विविधा » गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया गणेशभक्तांना टोल फ्री

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया गणेशभक्तांना टोल फ्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱया नागरिकांकडून टोल न आकारण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱया हजारो नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

या निर्णयानुसार, कोकणात जाण्यासाठी 11 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोल वसूली केली जाणार नाही. याशिवाय कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनाही टोल फ्री प्रवास करता येणार आहे. गणेशभक्तांना परतीचा प्रवासही टोल फ्री होणार आहे.गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱया नागरिकांची संख्या मोठी आहे. टोलमाफी केल्यामुळे गाड्या टोलनाक्मयांवर थांबणार नाहीत, त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्मयताही कमी असणार आहे.गेल्यावषीही सरकारने गणेशोत्सव काळात गणेशभक्तांसाठी अशाचप्रकारे टोल माफी केली होती.

 

Related posts: