|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जीवनात आई हीच प्रथम गुरु

जीवनात आई हीच प्रथम गुरु 

वार्ताहर /कुन्नूर :

जीवनात आई हीच प्रथम गुरु आहे. नंतरच्या काळात दुसरा गुरु म्हणून अंगणवाडी कार्यकर्त्याच आहेत. आज शिक्षक दिन साजरा होत असताना याठिकाणी पौष्टिक आहार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तुम्ही सर्वजण आपल्या अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार देताच पण यापुढेही अशाच प्रकारे कार्य पार पाडावे, असे आवाहन ग्रा. पं. अध्यक्षा सुजाता सासमिले यांनी केले.

येथील ग्रामपंचायत कार्यालयात अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या व मांगूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने पौष्टिक आहार कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मांगूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्याधिकारी निवेदिता कुपूरशेट्टी उपस्थित होत्या.

प्रारंभी सुरेखा करडे यांनी स्वागत केले. त्यानंतर मंगल मोरे, अलका पाटील, शोभा हेगले, अनिता खोत यांनी अंगणवाडीतील बालकांना व गर्भिणींना देण्यात येत असलेल्या विविध आहाराची माहिती दिली. यावेळी वैद्याधिकारी कुपूरशेट्टी यांनी, पौष्टिक आहार, पिण्याचे शुद्ध पाणी, युवतींना उच्च शिक्षण, विवाहाचे वय, प्रसुतीपूर्व लसीकरण याविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी ग्रा. पं. सदस्य नासिर मकानदार, शिवाजी निकम, वरुण कुलकर्णी, रेखा उपाध्ये, रत्नाबाई निरुके, जयश्री सुतार, सुरेश केनवडे, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार फफ्फे, लक्ष्मण कांबळे, गजानन कुलकर्णी, कर्याप्पा जत्राटे, प्रशांत पाटील, कुबेर गावडे, काका जिरगे यांच्यासह अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. पुष्पा भडगावे यांनी आभार मानले.

Related posts: