|Sunday, July 21, 2019
You are here: Home » Top News » ‘तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस’सोबत ‘डेव्हिड लाँइड क्लब्ज’चा भारतात करार

‘तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस’सोबत ‘डेव्हिड लाँइड क्लब्ज’चा भारतात करार 

ऑनलाईन टीम / पुणे :

डेव्हिड लॉइड लीजर या युरोपातील सर्वांत मोठय़ा आणि सर्वाधिक वेगाने वाढणाऱया उच्च दर्जाच्या रॅकेट्स, आरोग्य व तंदुरुस्ती क्लब्जने तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेससह आज त्यांच्या संयुक्त उद्मम कंपनीची- ‘डीएलएल तळवलकर्स क्लब प्रायव्हेट लिमिटेड’ची घोषणा केली आहे. भारतात डेव्हिड लॉइड लीझर क्लब्ज तळवलकर्स या ब्रॅण्डखाली उच्च दर्जाचे, कुटुंबकेंद्री आणि आरामदायी सदस्यत्वावर आधारित क्लब्ज बांधण्यासाठी व चालवण्यासाठी डेव्हिड लॉइड लीझर आणि तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेड यांनी ही संयुक्त मालकीची कंपनी स्थापन केली आहे.

Left to Right – Mr. Prashant Talwalkar, CEO, Talwalkars Better Value Fitness, Hazel Geary, COO, David Lloyd Leisure Clubs Talwalkars and Mr. Bruce Gardner, New Clubs Director, David Lloyd Leisure

भारतातील आरोग्य व तंदुरुस्तीच्या बाजारपेठेबद्दल तळवलकर्सला असलेले ज्ञान आणि दर्जेदार कुटुंबकेंद्री क्लब्जबाबत डेव्हिड लॉइड लीझर्सकडे असलेले कौशल्य यांचा मिलाफ साधून तसेच भारतातील वाढत्या उच्चमध्यमवर्गाला डोळय़ापुढे ठेवून क्लब्जचा एक नवीन मापदंड स्थापन करण्याचे उद्दिष्ट कंपनीपुढे आहे. डेव्हिड लॉइड लीझर क्लब्ज तळवलकर्स या ब्रॅण्डच्या भारतातील पहिल्या लीझर क्लबचे बांधकाम सध्या पुण्यातील वाकड भागात सुरू आहे आणि तो 2019च्या सुरुवातीला सदस्यांसाठी खुला होईल, अशी अपेक्षा आहे. यामध्ये क्रीडा व लीझर क्लबकडून असलेल्या सर्व मागण्या एका छताखाली पूर्ण होणार आहेत. टेनिस, पोहणे, फिटनेस, बॅडमिंटन आणि स्क्वॅशच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा या लीझर क्लबमध्ये उपलब्ध असतील, त्याचप्रमाणे सदस्यांसाठी अनेक रेस्टोरंट्सही असतील. उत्कृष्ट सुविधांसह लहान मुलांसाठी उत्तम प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध असतील आणि सदस्यांना क्रीडाप्रकार शिकण्यासाठी, तंत्रे विकसित करण्यासाठी व त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्येक क्रीडाप्रकार व तंदुरुस्तीबाबतचे कुशल मार्गदर्शन उपलब्ध असेल.

Left to Right – Mr. Prashant Talwalkar, CEO, Talwalkars Better Value Fitness, and Mr. Bruce Gardner, New Clubs Director, David Lloyd Leisure – Copy

या लाँचिंगच्या वेळी डेव्हिड लॉइड लीझरचे न्यू क्लब्ज डायरेक्टर ब्रुस गार्डनर म्हणाले, ‘आम्ही प्रथमच युरोपबाहेर डेव्हिड लॉइड क्लब्ज स्थापन करत आहोत आणि युरोपबाहेर आमचा क्लब स्थापन होत असलेला भारत हा पहिलाच देश आहे. भारतातील वाढत्या बाजारपेठेला आमच्या आरोग्य व लीझर क्लब्जच्या शैलीची ओळख करून देण्यासाठी स्थानिक बाजारपेठेला सुसंगत स्वरूपात सेवा उपलब्ध करण्यामध्ये आम्हाला तळवलकर्सची मोठी मदत होत आहे. उच्च दर्जाचे क्लब्ज बांधण्याचा आणि व्यक्ती, कुटुंब व लहान मुलांसाठी रोमांचक वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. उत्पन्नानुसार युरोपातील सर्वांत मोठय़ा हेल्थ ऍण्ड लीझर समूहाचे स्थान मिळवण्याइतपत आम्ही या ब्रॅण्डची वाढ केली आहे आणि या सहयोगामुळे आम्हाला आमचा ब्रॅण्ड आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवण्यात मदत होणार आहे.’

यावेळी तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत तळवलकर म्हणाले, ‘लग्झरी क्लब्ज ही संकल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड यशस्वी ठरली आहे आणि आता भारतातही ती जोर धरू लागली आहे. जागतिक स्तरावर डेव्हिड लॉइड क्लब्ज हे हेल्थ ऍण्ड लीझर क्लब्ज विकसित करण्याच्या तसेच चालवण्याच्या क्षेत्रातील सर्वांत मोठय़ा व सर्वोत्तम नावांपैकी एक आहे. तळवलकर्सच्या दृष्टीने क्लब बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी तसेच भारतातील हेल्थ ऍण्ड लीझर क्लब्जची धारणा बदलून टाकण्यासाठी ही एक मोठी संधी आहे. क्लबमधील सर्व क्रीडा आणि तंदुरुस्तीच्या सुविधांना पूरक असे लीझर, वेलनेस तसेच रेस्टोरंट्सचे पर्याय येथे उपलब्ध असतील. तळवलकर्सचे तंदुरुस्तीला अधिक चांगले मूल्य मिळवून देण्याचे तत्त्व अधिक उंचीवर नेणे या व्हेंचरमुळे शक्मय होणार आहे.’