|Sunday, November 18, 2018
You are here: Home » उद्योग » ट्रस्टला हिस्सा विकल्याने मलविंदरना न्यायालयाने फटकारले

ट्रस्टला हिस्सा विकल्याने मलविंदरना न्यायालयाने फटकारले 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

नवी दिल्ली उच्च न्यायालयाने मलविंदर सिंह यांना सिंगापूर येथील लिस्टेड रेलिगेयर हेल्थ ऑफ ट्रस्ट यामध्ये आपला समभाग विकल्याच्या कारणावरुन  त्यांना फटकारले आहे. 18.22 कोटी रुपयाची ही रक्कम असून ही चार महिन्याच्या आत न्यायालयात जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

या अगोदर ही जपानच्या औषध कंपनीसोबत चालू असणाऱया व्यवहार करण्याला मज्जाव केला आहे. तर त्याचे बंधू शिविंदर सिंह यांच्या विरोधात 35 हजार कोटी रुपयाचा दावा करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

न्यायालयात करण्यात आलेल्या सुनावणीत दरम्यान वादविदा करत असताना फोर्टीस आणि रनबॅक्सी फॉर्मर प्रमोटरकडून आरएचटीमध्ये 45 लाख युनिटसची खरेदी सिंगापूरात करण्यात आली होती. न्यायालयाकडून आता 11 ऑक्टोबर रोजी सुनावणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

 

 

Related posts: