|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » मर्सडीजकडून इलेक्ट्रिक कार सादर

मर्सडीजकडून इलेक्ट्रिक कार सादर 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

जगातील सर्वात मोठी लक्झरी कार उत्पादन करणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱया मर्सडीज बेन्झने आपली पहिल्या इलेक्ट्रिक इक्युएस कारचे सादरीकरण करण्यात आले आहे. मर्सडीजने टेस्ले कंपनीला टक्कर देण्यासाठी या कारचे सादरीकरण केले असून जादाचे उत्पादन पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती सीईओ डीटर जेटशे यांनी दिली आहे.

मर्सडीज बेन्झ ईक्युसी आकार हा बॅण्ड प्रसिद्धी करता जीएलसी एसयुव्ही च्या बरोबर आहे. या कारला एकदा चार्ज केल्यानंतर 450 किलोमीटर चालू शकते. म्हणजे 280 इतके मायलेज मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आणि 5.1 सेंकद कार एकसारखी धावल्यास ती 100 किलोमीटर प्रति तास अंतर पुर्ण करु शकते असा दावा कंपनीने केला आहे.  टेस्ला कारचे  मायलेज 237 इतके असल्याचे सांगण्यात आले आहे.

टेस्ला या कार कंपनीवर दबाव बनवण्याची तयारी मर्सडीज कंपनीकडून करण्यात येत असून उत्पादन वाढवून त्याच्या आधारे आपला बाजारात दबदबा निर्माण करण्याचा विचार मर्सडीजकडून करण्यात येत आहे.