|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » केपेच्या नगराध्यक्षपदी दयेश नाईक निश्चित

केपेच्या नगराध्यक्षपदी दयेश नाईक निश्चित 

प्रतिनिधी /केपे :

केपे पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी दयेश नाईक यांचा गुरुवारी एकमेव अर्ज आला असून त्यामुळे त्यांची नगराध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. गुरुवारी सकाळी नगराध्यक्षपदाकरिता अर्ज सादर करण्याच्या निर्धारित वेळेत नाईक यांनी आपले तीन अर्ज दाखल केले.

त्यातील पहिल्या अर्जाला अमोल काणेकर, दुसऱयाला फिलू डिकॉस्ता, तर तिसऱया अर्जाला उपनगराध्यक्ष पावलू फर्नांडिस यांनी अनुमोदन दिले आहे. अन्य कोणीही गुरुवारी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला नाही. आज शुक्रवार 7 रोजी सकाळी अर्जांची छाननी झाल्यानंतर नूतन नगराध्यक्षांची निवड जाहीर करण्यात येईल. निर्वाचन अधिकारी म्हणून केपेचे उपजिल्हाधिकारी रोहित कदम काम पाहणार असून पालिका मुख्याधिकारी दर्शनी देसाई त्यांना सहकार्य करणार आहेत.