|Thursday, June 20, 2019
You are here: Home » उद्योग » वेळेवर ईएमआय न दिल्यास दोन टक्के अधिक व्याज

वेळेवर ईएमआय न दिल्यास दोन टक्के अधिक व्याज 

वृत्तसंस्था / मुंबई

वैयक्तिक कर्जाची ईएमआय वेळेत सादर न केल्यास त्याच्या रकमेवर 2 टक्के व्याज द्यावे लागण्याची शक्यता आहे. बँका वैयक्तिक कर्जाचा ईएमआय वेळेत न दिल्यावर जमा न होणाऱया रकमेवर दंड आकारतात. यामुळे वैयक्तिक कर्ज घेणाऱयांना हा नियम माहित पाहिजे. वैयक्तिक कर्ज घेतल्यास ईएमआय वेळेत सादर करण्यात यावा. या नियमाचे पालन न केल्यास जास्त व्याज द्यावे लागेल.

भारतीय स्टेट बँकेकडून 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक कर्जावर अशा प्रकारे दंड द्यावा लागत नाही. मात्र कोणीही 25 हजार रुपयांपेक्षा जास्त वैयक्तिक कर्ज घेतल्यास आणि वेळेवर ईएमआय न दिल्यास थकीत रकमेवर बँकेकडून 2 टक्के जास्त वसुली करण्यात येते. ग्राहकाला 12 टक्क्यांऐवजी 14 टक्के व्याज द्यावे लागते. अशा प्रकारे दंड ग्राहकाकडून वेळेत व्याज देण्यात येत नाही, तोपर्यंत लागू होतो.