|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » क्रिडा » आशिया क्रिकेट चषकाचे अनावरण

आशिया क्रिकेट चषकाचे अनावरण 

वृत्तसंस्था/ दुबई

15 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरात येथे होणाऱया सहा देशांच्या आशिया चषक वनडे क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचे अनावरण शुक्रवारी दुबईत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

संयुक्त अरब अमिराचे क्रीडा, युवा, सांस्कृतिक आणि सामाजिक विकास खात्याचे मंत्री शेख नेहान बिन मुबारक अल नेहान यांच्या हस्ते या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण करण्यात आले. शेख नेहान हे संयुक्त अरब अमिरात मंत्रीमंडळाचे सदस्य तसेच अमिरात क्रिकेट मंडळाचे चेअरमन आहेत. भारतीय संघ या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. संयुक्त अरब अमिरात दुबई आणि अबुधाबी येथे ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

या स्पर्धेत एकूण सहा संघांचा समावेश असून ते दोन गटात विभागण्यात आले आहेत. अ गटात भारत, पाक, हॉंगकॉंग, ब गटात श्रीलंका, बांगलादेश, अफगाणीस्थान यांचा समावेश आहे. लंकन संघाने आतापर्यंत ही स्पर्धा पाचवेळा जिंकली असून बांगलादेशने दोनवेळा या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले आहे.