|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » इंग्रजी विषय सुधारण्याची एक गुरूकिल्ली ‘द मॅजिक ऑफ व्हर्बस्’

इंग्रजी विषय सुधारण्याची एक गुरूकिल्ली ‘द मॅजिक ऑफ व्हर्बस्’ 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

द मॅजिक ऑफ व्हर्बस् या इंग्रजी क्रियापदांवर आधारीत पुस्तकाचा प्रकाशन सोहळा केशवराव भोसले नाटय़गृह कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, इंग्रजी विषयाचे शिवाजी विद्यापीठातील माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. जयप्रकाश शिंदे, प्रा. डी. एन. पंगू, सौ. कविता सावंत व बिझी प्रकाशनचे प्रकाशक व लेखक प्रा. एम. बी. सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला.

प्रा. डॉ. जयप्रकाश शिंदे सदर पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त केले.  पुस्तकाचे लेखक प्रा. एम. बी. सावंत यांनी क्रियापदांशी निगडीत असलेले 15 वेगवेगळे घटक या पुस्ताकत मांडले आहेत. प्रत्येक घटक हा अत्यंत उपयुक्त असून, प्रत्येक घटकाखाली स्वाध्याय देऊन शेवटी उतरांची सूचीही दिलेली आहे, असे प्रा. डी. एन. पंगू आपल्या मनोगतात म्हणाले. हे पुस्तक व्हर्बस्, व्हर्बस एव्हरीवेअर असून, प्रा. सावंत यांनी क्रियापदांवरती संशोधन करून हा प्रबंध लिहिला आहे. त्यामुळे हे पुस्तक मराठी व इंग्रजी वाचकांसाठी पर्वणी ठरेल.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे यांनी इंग्रजी जागतिक भाषा बनली आहे. त्यामुळे आजच्या युगात इंग्रजीचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. क्रियापद हा इंग्रजीचा एक भक्कम पाया आहे. भाषेसाठी क्रियापद महत्वाचे आहे ते सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी जाधव सर, शर्वरी पाटील, शीतल कासार, सुस्मित जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

कविता सावंत व लेखक प्रा. एम. बी. सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ऐश्वर्या बहिरे व आभार शैलजा पाटील यांनी केले.