|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शाळेला सर्वोत्परी सहकार्य करू

शाळेला सर्वोत्परी सहकार्य करू 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

अभ्यासाच्या जोरावर विद्यार्थी यशाचे शिखर गाठू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या वयातच अभ्यास केला पाहिजे. शाळेच्या प्रगतिसाठी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्वोत्परी सहकार्य करू, असे आश्वासन माजी विद्यार्थी, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले.

भवानी मंडप येथील मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळाही उत्साहात पार पडला. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबपुष्प देवून सत्कार केला. माजी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पाटील होते.

आयुक्त देशमुख म्हणाले, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक नेहमीच प्रयत्न करीत असतात. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूवर्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रमाबरोबर  कौशल्यावर आधारीत नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. त्याबरोबर त्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तसेच शिक्षकांनी केलेल्या कार्याचे कौतुक करीत शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

माजी विद्यार्थी बाजीराव मानगावे, संध्या शिंदे, सुप्रिया पोवार, शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य अशोकराव देशमुख यांनी केले. पाहुण्यांची ओळख व्ही. बी. डोणे यांनी करून दिली. बक्षीस पत्राचे वाचन जी. व्ही. खाडे यांनी केले. ए. एस. देवकर यांनी आभार मानले. यावेळी मुरलीधर फराकटे, प्रविण चव्हाण, शकील मुजावर, अरूण पाटील, सचिन उंडाळे, झाकीर पकाली, सलीम बागवान, किरण जाधव, फारूक पटेल, विनोद उंडाळे, प्रविण चव्हाण,  बाबुराव वाळवे, ए. के. कांबळे आदी उपस्थित होते.

Related posts: