|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा

शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा 

एस. बालन समुहाचे अध्यक्ष पुनित बालन यांचे प्रतिपादन, गोवे येथील स्वयंसिध्दा किट व संगणक संच वितरण कार्यक्रम

प्रतिनिधी / सातारा

एस. बालन ग्रुप व परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेल्या वस्तुचा वापर विद्यार्थ्यांनी चांगल्या का, वाईट कामांसाठी करण्याचा हा निर्णय तुमचा आहे.  सध्याचे युग हे सोशलमिडीयांचे असून अगामी काळात देश चालवण्याची जबाबदारीही युवकांच्या हाती येणार आहे. विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे शिक्षण घेवून स्वत:ला सिध्द करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन एस. बालन समुहाचे अध्यक्ष पुनित बालन यांनी केले.

 सातारा जिल्हय़ातील ग्रामीण भागातील वाढत्या वयोगटातील मुलींसाठी आशा प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे. या प्रोजेक्ट अंतर्गंत महाराष्ट्रात प्रथमच स्वयंसिध्दा किट व संगणक संच वितरण समारंभ शुक्रवार गोवे, (ता. सातारा) येथील सहकार महर्षि जिजाबा आण्णा जाधव सांस्कृतिक भवनात उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तसेच जिह्यातील 38 शाळेतील विद्यार्थीनींना स्वयंसिध्दा किटचे व संगणक संचाचे वाटप करण्यात आले.

 यावेळी प्राथमिक गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, ग्यान की लायब्ररीचे संस्थापक प्रदीप लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, कोटेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नंदाभाऊ जाधव, बचतगट समुहाच्या अध्यक्षा माधुरीताई जाधव, गोव्याच्या सरपंच आशाताई जाधव, सासवडच्या जगताप फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष जगताप, पुण्याच्या परिवर्तनचे अभिजित घुले उपस्थित होते.

  एस. बालन समुहाचे अध्यक्ष पुनित बालन पुढे म्हणाले, हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्राभर राबवण्याचा आमचा मानस आहे. तसेच आम्ही प्रत्येक वर्षी दुर्गम भागातील गरिब व गरजू विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी 700 सायकलींचे वाटप करत होतो. मात्र, आता प्रत्येक वर्षी 700 कॉम्यूटरसचे वाटप करणार आहोत. देणारा तर देव आहे, आम्ही फक्त निमित्त असल्याचे त्यांनी सांगितले.

  गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण म्हणाले, परिवर्तन हा समाजाचा नियम आहे, केंद्र व राज्य शासनाने आतापर्यंत शिक्षण क्षेत्रासाठी विविध योजना राबवल्या आहेत. मात्र अजून जिल्हय़ातील बऱयांच शाळा शैक्षणिक अनुदानांपासून वंचित आहेत. त्यामुळे जिह्यातील वंचित शाळांना आपल्या संस्थेतर्फे चांगल्या सोईसुविधा मिळाव्यात असे सांगतिले. 

 जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील म्हणाले, प्राचीन काळापासून आपल्या देशात स्त्रियांना विशेष महत्व असून प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रिचा हात असतो. आज विद्यार्थ्यासमोर सोशलमिडीयाचे सर्वांत मोठे आवाहन महाराष्ट्रातील बहुतांशी भागात अजून नागरिक निरक्षर असून त्याचेप्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

 कार्यक्रमाची प्रस्ताविका सचिन जगताप, आभार प्रदर्शन यांनी केले. यावळी गोवे, लिंब, मालगाव, नागेवाडी, पाटखळ, करंडी, पवारवाडी, सायगाव, शिवथर, माण आदी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थींनी तसेच शिक्षक परिसरातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.