|Sunday, February 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » लोणंद येथे आद्यक्रांतिवीर उमाजी नाईकांना अभिवादन

लोणंद येथे आद्यक्रांतिवीर उमाजी नाईकांना अभिवादन 

वार्ताहर/ लोणंद

भारतीय स्वातंत्र्य लढय़ातील प्रथम सशस्त्र क्रांतीची सुरुवात करणारे सर्व प्रथम स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढणारे, तसेच ब्रिटिश सत्तेला सलग 14 वर्षे सळो की पळो करून सोडणारे आद्यक्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांची 227 वी जयंती नगरपंचायत लोणंद येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाळासाहेब बागवान यांच्या हस्ते आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शरद भंडलकर, म्हस्कूआण्णा शेळके, बाळासाहेब शेळके, वामन भंडलकर, अमित भंडलकर, प्रशांत जाधव, विशाल भंडलकर, अजित माने, शंकर शेळके, बाळासा भिसे, विजय बनकर, रोहित निंबाळकर, विजय गाडे, पापाभाई पानसरे आदींसह नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी उपाध्यक्ष बागवान यांनी, आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पराक्रमाचे कौतुक केले व त्यांची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

Related posts: