|Saturday, July 20, 2019
You are here: Home » क्रिडा » बेल्जियमचा स्कॉटलंडवर एकतर्फी विजय

बेल्जियमचा स्कॉटलंडवर एकतर्फी विजय 

वृत्तसंस्था / हॅम्पडेन

शुक्रवारी येथे झालेल्या मित्रत्वाच्या फुटबॉल मालिकेतील सामन्यात बेल्जियमने यजमान स्कॉटलंडचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात बेल्जियमतर्फे लुकाकु, इडेन हेजार्ड यांनी प्रत्येकी एक तर मिची बॅटशुयाई याने दोन गोल केले.

रशियात झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत बेल्जियमने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता. शुक्रवारच्या सामन्यात स्कॉटलंडकडून झालेल्या अनेक चुकांचा अचूक फायदा बेल्जियम घेतला. उभय देशांमध्ये पाच सामन्यांची ही फुटबॉल मालिका खेळविली जात असून स्कॉटलंडचा हा चौथा पराभव आहे. या सामन्यात लुकाकुने खेळाच्या पूर्वार्धात बेल्जियमचे खाते उघडले. लुकाकुचा हा 41 वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. त्यानंतर उत्तरार्धातील खेळाच्या तिसऱया मिनिटाला हेजार्डने बेल्जियमचा दुसरा गोल केला. दरम्यान, आठ मिनिटाच्या कालावधीत बॅटशुयाईने दोन गोल करून स्कॉटलंडचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. स्कॉटलंडला या सामन्यात शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही.