|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा » ब्राझीलचा अमेरिकेवर एकतर्फी विजय

ब्राझीलचा अमेरिकेवर एकतर्फी विजय 

वृत्तसंस्था / न्यू जर्सी

शुक्रवारी येथे झालेल्या मित्रत्वाच्या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात ब्राझीलने अमेरिकेचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. ब्राझील संघातर्फे नेम्मार आणि रॉबर्टो फिरमीनो यांनी प्रत्येकी एक गोल केला.

शुक्रवारी रात्री झालेल्या या सामन्याला हजारो फुटबॉल शौकिन उपस्थित होते डग्लसकोस्टाच्या पासवर फिरमिनोने ब्राझीलचे खाते उघडले. 44 व्या मिनिटाला नेम्मारने पेनल्टी कीकवर ब्राझीलचा दुसरा गोल नोंदविला. नेम्मारचा हा 91 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील 58 वा गोल आहे. ब्राझीलच्या फुटबॉल क्षेत्रामध्ये सर्वाधिक गोल करणाऱया फुटबॉलपटूंच्या यादीत नेम्मार तिसऱया स्थानावर आहे. ब्राझीलच्या फुटबॉल संघात पेले यांनी 77 गोल तर रोनाल्डोने 62 गोल नोंदविले आहेत. गेल्या ऑक्टोंबरमध्ये सॅरेचेन यांनी अमेरिकन संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिकेने दोन सामने जिंकले असून दोन सामने गमविले आहेत तसेच तीन सामने अनिर्णित राखले आहेत. रशियात झालेल्या फिफाच्या व़िश्वकरंडक स्पर्धेसाठी अमेरिकेला आपली पात्रता सिद्ध करता आली नव्हती.