|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत-मालदीव फुटबॉल सामना आज

भारत-मालदीव फुटबॉल सामना आज 

वृत्तसंस्था / कोलंबो

बांगबंधू नॅशनल स्टेडियमवर रविवारी विद्यमान विजेता भारत आणि मालदीव यांच्यात सॅफ चषक फुटबॉल स्पर्धेतील सामना खेळविला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास प्रशिक्षक स्टिफेन कॉन्स्टेनटाईन यांनी व्यक्त केला आहे.

सध्याच्या भारतीय फुटबॉल संघामध्ये अनेक नवोदित आणि अननुभावी खेळाडूंचा समावेश आहे. मालदीव संघामध्ये बरेच अनुभवी खेळाडू आहेत. यापूर्वी या दोन संघामध्ये 18 सामने झाले असून त्यापैकी भारताने 13 सामने जिंकले आहेत. 2015 साली 15-16 झालेल्या सॅफ फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य सामन्यात या दोन संघांची गाठ पडली होती आणि भारताने मालदीववर 3-2 अशा गोलफरकाने विजय मिळविला होता, असेही भारतीय संघाच्या प्रशिक्षकांनी सांगितले. मालदीव संघाने या स्पर्धेतील आपला सलामीचा लंकेविरूद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत राखल्याने त्यांना पूर्ण गुण मिळविता आले नाहीत.