|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आयुष महाविद्यालयांचे प्रश्न सोडवणार : आ. विक्रम काळे

आयुष महाविद्यालयांचे प्रश्न सोडवणार : आ. विक्रम काळे 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 देशातील आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी महाविद्यालयाच्या प्रवेशासह अन्य प्रश्नांवर लवकर निर्णय घेणार आहे. हे प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाही केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिल्याचे असोसिएशन ऍाफ मॅनेजमेंट ऍण्ड होमिओपॅथी मेडिकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष, लातूरचे आमदार विक्रम काळे यांनी सांगितले. आमदार काळे यांनी गुरूवारी येथील पंचाचार्य होमिओपॅथी महाविद्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

 आमदार काळे म्हणाले, मी आणि असोसिएशनचे सचिव पृथ्वीराज पाटील यांनी केंद्रीय मंत्री नाईक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आयुष महाविद्यालयांच्या समस्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

 कोल्हापूरमधील पंचाचार्य होमिओपॅथी महाविद्यालयात गुरूवारी आमदार काळे यांचा प्राचार्य डॉ. राजकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी   डॉ. हिम्मतसिंह पाटील, डॉ. सुहास पाटील, डॉ. मिलिंद गायकवाड, डॉ. फरजाना मुक्कदम, डॉ. सुजाता कामिरे, डॉ. दीपाली पाटील, डॉ. सुनेत्रा शिराळे, डॉ. गितांजली कोरे, डॉ. वर्षा पाटील, डॉ. संतोष रानडे आदी उपस्थित होते.