|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांचा शिवसेनेत प्रवेश

माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांचा शिवसेनेत प्रवेश 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी शुक्रवारी मुंबईत मातोश्रीवर जावून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून शिवसेना प्रवेशाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दूधवडकर, आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते. इंगवले हे शेकापचे ज्येष्ठ नेते (कै.) प्रा. विष्णूपंत इंगवले यांचे पुत्र असून त्यांनी नगरसेवक, उपमहापौरपदही भूषविले आहे. त्यांच्या पत्नी तेजस्विनी इंगवले या नगसेविका आहे. इंगवले यांच्या शिवसेनाप्रवेशामुळे ताराराणी आघाडीला धक्का बसला आहे.