|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बार्शी तालुक्यातील सहकारी सोसायटीत 68 लाखांचा अपहार

बार्शी तालुक्यातील सहकारी सोसायटीत 68 लाखांचा अपहार 

तीन अधिकारी, संस्थेच्या चेअरमनसह 21 जणांविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी/ बार्शी

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक सोलापूर अंतर्गत असलेल्या गुळपोळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गुळपोळी ता. बार्शी या संस्थेत 68 लाख 3686 रु. रकमेचा अपहार झाला असून जि. म. बँकेचे तीन अधिकारी संस्थेचा चेअरमन, सचिव, संचालक मंडळ अशा 21 जणांविरोधात बार्शी ता. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तालुक्यात खळबळ उडाली आहे.

गुळपोळी विकास सेवा सह. संस्थेचा चेअरमन राजाराम मचाले, सचिव संताजी वांगदरे, सोलापूर जि.म. बँकेचे शाखा निरीक्षक संभाजी डोईफोडे, गोविंद शिंदे, नृसिंह वांगदरे, संचालक गोविंद चिकणे, शिवाजी बारसकर, लक्ष्मण शिंदे, रामचंद्र चिकणे, भागवत फोके, नेमिनाथ जैन, बाबासाहेब चिकणे, विलास माळी, आनंदकुमार नरखडे, दिगंबर काळे, बिभिषण पवार, कल्याण चिकणे, प्रभाकर चौधरी, संचालिका आशा चिकणे, लता डोके, विलास सावंत अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. लेखापरिक्षक राजकुमार तिपे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केले.

गुळपोळी येथील जि.म. बँक सोलापूर अंतर्गत गुळपोळी विविध कार्यकारी सेवा सोसायटी कार्यरत असून या सोसायटीची 1 एप्रिल 2008 ते 31 मार्च 2017 अखेर लखापरिक्षण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश सहा. निबंधक बार्शी यांनी दिले होते. या कालावधीमधील संस्थेचे वार्षिक सभा ठराव प्राप्त झाले, त्यानुसार लेखापरिक्षण करण्यात आले. 27 जून 2018 रोजी लेखापरिक्षण अहवाल पुर्ण करुन सहा. निबंधक यांचेकडे तसेच गुळपोळी सोसा. ला देण्यात आला.

लेखापरिक्षणामध्ये 1 एप्रिल 2008 ते 31 मार्च 2017 या कालावधीमध्ये सभासद कर्ज वसुलीची रक्कम बँकेत भरणा केली नाही. यामध्ये रोख रक्कम 45 लाख 37 हजार 653 रु. असून वसुलपात्र रक्कम 22 लाख 98 हजार 433 रु. आहे. असे दोन्ही रक्कमा मिळून 68 लाख 36 हजार 86 रु. रकमेचा अपहार केला असल्याचे निर्दशनास आले. बँकेचे तत्कालीन अधिकारी, संस्था चेअरमन सचिव, संचालक मंडळ यांनी रकमेचा स्वतःचे हितासाठी वापर केला. सार्वजनिक मालमत्तेचे जाणून बुजुन विश्वासघात करुन फसवणूक केली आहे. आर्थिक व्यवहारामधील अनियमितता दिसून आली असून सर्व 21 जण जबाबदार आहेत असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. तपास पो. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बेदरे करीत आहेत.

 

Related posts: