|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाई तालुक्यातील हातपंपांची दुरवस्था

वाई तालुक्यातील हातपंपांची दुरवस्था 

वार्ताहर/  पाचवड

वाई तालुक्यातील पाचवड, अमृतवाडी, खडकी, कुंभारवाडी, उडतारे, आसले, विराटनगर या विविध भागातील हातपंपांची दुरवस्था झाली असून ज्या हातपंपांचे पाणी नागरिक भरतात, त्या हातपंपालगत व परिसरात स्वच्छता करण्यास मात्र टाळाटाळ केली जात आहेत. त्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रत्येकाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. येथील ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा होत नाही. तसेच प्रादेशिक पाणी योजनेतील काही दोषामुळे या पाणीपुरवठय़ाच्या घटना घडत असल्याने नागरिकांना हातपंप, खाजगी विहिरींच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी गावागावांत ठिकठिकाणी हातपंप काढण्यात आले आहेत, त्यांना पाणीही आहे. नागरिक त्याठिकाणचे पाणी भरुन नेतात. मात्र, हातपंपाजवळ धूणी, भांडीही करतात. तसेच या हातपंपाच्या शेजारुनच काही घाणपाण्याची गटारेही वाहताना  दिसत आहेत. हातपंप परिसराची स्वच्छता करण्याचा विचार येथील आरोग्य विभागाच्या मनातही येत नाही, त्यामुळे याठिकाणी अस्वच्छतेची वाढच होत आहे.

त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचत असून डासांच्या वाढीसाठी अनकुल स्थिती निर्माण होत आहे. याप्रकारामुळे डासांचा त्रास होवून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तसेच या हातपंपातून काही वेळेस खराब पाणी येत असून संबंधित विभागाचे दुर्लक्ष पाहायला मिळत आहे.

Related posts: