|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बीसीसीआयच्या ड्राफ्टनुसार घटना मसुदय़ाला जीसीएच्या आमसभेची मंजूरी

बीसीसीआयच्या ड्राफ्टनुसार घटना मसुदय़ाला जीसीएच्या आमसभेची मंजूरी 

 

 क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

सुप्रीम कोर्टने मंजूरी दिलेल्या बीसीसीआयच्या ड्राफ्टनुसार बदल करण्यासाठी जीसीएच्या काल पर्वरीत पीसीएवर झालेल्या तातडीच्या आमसभेत मंजुरी मिळाली. काल झालेल्या आमसभेला 80 हून अधिक क्लबांची उपस्थिती होती.

यावेळी गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सूरज लोटलीकर, सचिव दया पागी तसेच खजिनदार जमीर करोल उपस्थित होते. लोढा आयोगाच्या शिफारसी स्वीकारण्या पलिकडे जीसीएशी पर्याय नाही. याचा अंतिम मसुदा बीसीसीआयच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी अध्यक्ष सूरज लोटलीकर यावेळी म्हणाले.

धारगळात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमसाठी जीसीएचे सचिव दया पागी व सागचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई यांच्यात झालेल्या लीझ कराराबद्दल आमसभेने जीसीएचे अध्यक्ष सूरज लोटलीकर, सचिव दया पागी व खजिनदार जमीर करोल व व्यवस्थापकीय मंडळातील सदस्यांचे अभिनंदन केले. जीसीए व्यवस्थापकीय मंडळाच्या निवडणुका झाल्यानंतर धारगळ येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे यावेळी सूरज लोटलीकर म्हणाले.

दरम्यान, गोवा क्रिकेट संघटनेने 19 वर्षाखालील गोवा क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी माजी रणजीपटू आणि लॅव्हल 3 क्रिकेट प्रशिक्षक विनोद धामस्कर यांची प्रशिक्षकपदी निवड केली आहे. सध्या धामस्कर हैदराबादेत सराव करणाऱया 19 वर्षांखालील संघासमवेत आहेत.

Related posts: