|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फॉर्मेलिन प्रकरण ‘एफएसएसआय’कडे द्यावे

फॉर्मेलिन प्रकरण ‘एफएसएसआय’कडे द्यावे 

प्रतिनिधी/ पणजी

  एफडीएला फॉर्मेलिनचा विषय हाताळण्यास पूर्णपणे अपयश आले असून हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी एफएसएसआयकडे सोपवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजीव रायतूरकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केली.

राज्यात फॉमेर्लिनविषयी योग्य कारवाई करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. बाहेरुन येणाऱया मासळीच्या ट्रकांची योग्यरित्या तपासणी होत नाही. एफडीए लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे. या मासळीची योग्य तपासणी केली जात नाही. रात्रीच्या वेळी ही मासळी दाखल होत असते त्यामुळे एफएसएसआयने प्रत्येक आयात मासळी ट्रकमधील मासळी तपासावी असे झाले तर हा विषय सुटणार आहे. एफडीएला हा प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. एफडीएचा संचालिका कोणाचा फोन घेत नाही कुणाच ऐकून घेत नाही. हा लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असून यात आरोग्यमंत्री व एफडीएच्या संचिलालिका लोकांच्या अरोग्याशी खेळत आहे असा अरोपही यावेळी संजीव रायतूरकर यांनी केले.

मासळी हा गोमंतकीयांचा प्रमुख अन्न असून यामुळे लोक भयभित झाले आहे. तसेच मासळीचा व्यवसाय करणारे लोकही गोमंतकीय आहे ही मासळी विकण्यास घाबरत आहे. त्यामुळे आता स्थानिक मासळी लोकांना खरेदी करावी लागते. सरकार लोकांना या विषयी कुठलेच योग्य असे आश्वासन देत नाही. जर मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण एफसीसीआयकडे सोपविले नाहीतर अम्ही कोर्टात हा विषय घेऊन जाणार आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.

Related posts: