|Monday, April 22, 2019
You are here: Home » leadingnews » ‘अजेय भारत, अटल भाजप’ या नवीन नाऱयासह भाजपा 2019 च्या रिंगणात उतरणार

‘अजेय भारत, अटल भाजप’ या नवीन नाऱयासह भाजपा 2019 च्या रिंगणात उतरणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भाजपाच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या संभाव्य महाआघाडीवर जोरदार टीका केली आहे. नेतृत्वाचा पत्ता नाही, नीती अस्पष्ट आणि नियत भ्रष्ट, अशी विरोधकांची अवस्था झालेली असल्याचे सांगत मोदींनी 2019 च्या निवडणुकीसाठी अजेय भारत, अटल भाजपा असा नवा नारा दिला आहे.

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आटोपल्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणांमधील सारांश प्रसारमाध्यमांसमोर मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाआघाडीचा उल्लेख स्वार्थाने प्रेरित झालेली आघाडी असा करताना महाआघाडी म्हणजे नेतृत्वाचा पत्ता नाही, नीती अस्पष्ट आणि नियत भ्रष्ट अशी असल्याचे म्हटले, अशी माहिती प्रसाद यांनी दिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तयारीला लागलेल्या भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत व्हिजन 2022 सादर करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधकांच्या एकजुटीवर निशाणा साधला. विरोधकांकडे नेता, निती आणि रणनिती यापैकी काहीही नसल्याची टीका त्यांनी केली. हताश झालेल्या विरोधकांकडून सध्या नकारात्मक राजकारण सुरू असल्याचंदेखील त्यांनी म्हटले. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या दुसऱया दिवशी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव कार्यकारणीनं एकमतानं मंजूर केला. 2022 पर्यंत ‘न्यू इंडिया’ साकारण्याच्या मुद्याचा समावेश या प्रस्तावात आहे. राजकीय प्रस्तावात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाचं कौतुक करण्यात आलं असून ‘न्यू इंडिया’चा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. न्यू इंडियामध्ये ना कोणी गरीब असेल, ना कोणी बेघर असेल, असे भाजपाकडून सांगण्यात आले.

Related posts: