|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » क्रिडा » ब्रिटनचा धावपटू मो फरा विजेता

ब्रिटनचा धावपटू मो फरा विजेता 

वृत्तसंस्था/ लंडन

रविवारी येथे झालेल्या ग्रेट नॉर्थ मॅरेथॉनचे अजिंक्यपद ब्रिटनचा आंतरराष्ट्रीय धावपटू मो फराने पटकाविले. फराने ही मॅरेथॉन विक्रमी पाचव्यांदा जिंकली आहे.

रविवारी झालेल्या या मॅरेथॉनमध्ये मो फराने विजेतेपद मिळविताना 59 मिनिटे आणि 26 सेकंदाचा अवधी घेतला. 2015 साली त्याने ही मॅरेथॉन स्पर्धा दुसऱयांदा जिंकताना वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना 59 मिनिटे 22 सेकंदाचा अवधी घेतला होता. दरम्यान, फराला आपली स्वत:चीच सर्वोत्तम कामगिरी मागे टाकण्यासाठी 4 सेकंदाचा कालावधी अधिक नोंदविला गेला. फराने ग्रेट नॉर्थ मॅरेथॉन सलग पाचव्यांदा जिंकली आहे. या मॅरेथॉनमध्ये महिला गटातील विजेतेपद केनियाच्या व्हिव्हिन चेरीयॉटने पटकाविताना 67 मिनिटे 43 सेकंदाचा अवधी घेतला.

Related posts: