|Saturday, April 20, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंडच्या अँडरसनला दंड

इंग्लंडच्या अँडरसनला दंड 

वृत्तसंस्था/ लंडन

यजमान इंग्लंड विरूद्ध सुरू असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीतील खेळाच्या दुसऱया दिवशी पंचांच्या निर्णयाबाबत मैदानावर बेशिस्त वर्तन करून शिस्तपालन नियमाचा भंग करणाऱया इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला दंड करण्यात निर्णय घेण्यात आला आहे.

अँडरसनला मिळणाऱया सामना मानधन रक्कमेतील 15 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागेल. 2016 च्या सप्टेंबरमध्ये आयसीसीने शिस्तपालन नियमात बदल करून त्याची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर अँडरसनकडून हा पहिला गुन्हा असल्याने त्याच्यावर सौम्य कारवाई करण्यात आली. भारताच्या पहिल्या डावातील शनिवारी कर्णधार कोहलीविरूद्ध अँडरसनने पायचीतचे जोरदार अपील केले पण पंच धर्मसेना यांनी ते फेटाळून लावले. अँडरसनने पंचांच्या दिशेने आपली कॅप हवेत उडवून प्रक्रिया व्यक्त केली. या कारणास्तव आयसीसीचे सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत अँडरसनने आपला गुन्हा कबुल केला.

 

Related posts: