|Saturday, July 20, 2019
You are here: Home » क्रिडा » स्पेन, बोस्निया संघांचे निसटते विजय

स्पेन, बोस्निया संघांचे निसटते विजय 

वृत्तसंस्था/ लंडन

नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी विंब्ले स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सलामीच्या सामन्यात स्पेनने यजमान इंग्लंडचा 2-1 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला तर दुसऱया एका सामन्यात बोस्नियाने उत्तर आयर्लंडवर 2-1 अशी मात केली.

स्पेन आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना शेवटपर्यंत चुरशीचा झाला. रशियातील झालेल्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडला उपांत्य फेरीत  क्रोएशियाकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर तब्बल दोन महिन्यांच्या कालावधी दरम्यान इंग्लंडचा दुसरा पराभव आहे. शनिवारच्या सामन्यात स्पेनतर्फे सेयुल निगेझ आणि रॉड्रिगो यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. इंग्लंडतर्फे 11 व्या मिनिटाला हॅरी केनने खाते उघडले होते. या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या हॅरी केनला इंग्लंड संघाचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांच्या हस्ते विश्वकरंडक स्पर्धेतील मिळालेला गोल्डन बूट चषक देवून गौरविण्यात आले. या सामन्याला सुमारे 80 हजार शौकिन उपस्थित होते. इंग्लंडच्या फुटबॉल संघाला अलिकडच्या कालावधीत सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. क्रोएशिया, बेल्जियम आणि स्पेन यांनी इंग्लंडवर मात केली आहे.

नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या दुसऱया सामन्यात बोस्नियाने उत्तर आयर्लंडचा 2-1 असा पराभव केला. बोस्नियातर्फे हॅरीस डुलजेविक आणि इलवेस सॅरीक यांनी गोल केले. उत्तर आयर्लंडतर्फे ग्रीगने एकमेव गोल नेंदविला.