|Sunday, July 21, 2019
You are here: Home » क्रिडा » जेमी मरे-बेथनी मॅटेक सँड्स विजेते

जेमी मरे-बेथनी मॅटेक सँड्स विजेते 

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

ब्रिटनचा जेमी मरे व अमेरिकेची बेथनी मॅटेक सँड्स यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. सलग दुसऱयांदा ही स्पर्धा जिंकणारा मरे हा बॉब ब्रायननंतरचा दुसरा खेळाडू आहे. बॉबने 2003-04 मध्ये असा पराक्रम केला होता. मरे-बेथनी यांनी अंतिम फेरीत क्रोएशियाचा निकोला मेकटिक व पोलंडची ऍलिसिया रोजोल्स्का यांच्यावर 2-6, 6-3, 11-9 अशी मात केली. मरेने गेल्या वषी स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससमवेत येथे जेतेपद पटकावले होते. बेथनीसाठी देखील हे जेतेपद महत्त्वाचे ठरले असून मागील विम्बल्डनमध्ये तिला गुडघ्याची गंभीर दुखापत झाली होती. ‘जेतेपद मिळाल्यानंतर मी काहीशी भावूक झाले. या स्पर्धेतील सर्वच सामन्यात माझ्याकडून खरोखरच खूप छान प्रदर्शन झाले. दुखापतीचा कालावधी बाजूला सारून कोर्टवर उतरल्यानंतर फक्त टेनिसवर लक्ष केंद्रित करणे एवढेच मी केले आणि त्यात मला यश मिळाले,’ असे बेथनील नंतर म्हणाली.