|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जबरी चोरी, दरोडा घालणारी गुन्हेगारांची टोळी जेरबंद

जबरी चोरी, दरोडा घालणारी गुन्हेगारांची टोळी जेरबंद 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सनराईज बीअर बारच्या मालकांवर दहशत निर्माण करीत लाथाबुक्कयाने मारहाण केली. बारच्या पॅश काऊंटरमधील रोकड लंपास करीत, बार मधील दारुच्या फोडीत काही दारुच्या बाटल्या लुटण्यात आल्या होत्या. या भरदिवसा घडलेल्या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली.  याप्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या एका नामचिन टोळीच्या म्होरक्यासह चौघांच्या मुसक्या आवळला. तर टोळीतील अन्य दोघे पोलिसाची चाहुल लागताच पसार झाले. 

पोलिसांनी अटक केलेल्यांच्यामध्ये देवेंद्र उर्फ डेब्या रमेश वाघमारे (वय 30, रा. रेल्वे फाटक, टेबलाईवाडी), आकाश बाबासाहेब बिरंजे (वय 23, रा. कनाननगर), सागर कुमार पिसे (वय 22, रा. मंगळवार पेठ), अक्षय अशोक गिरी (वय 20, रा. जोशी गल्ली, विक्रमनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या चौघांना पोलिसांनी शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तर लखन देवकुळे, संजय वाघमारे (संपूर्ण पता समजू शकला नाही) अशी पसार झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. ही कारवाई शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यानी केली.

अटक केलेल्या टोळीचा देवेंद्र उर्फ डेब्या वाघमारे हा मुख्य म्होरक्या आहे. त्याच्यासह त्याच्या टोळीतील आकाश बिरंजे, सागर पिसे, अक्षय गिरी, लखन देवकुळे, संजय वाघमारे या सहा जणांनी गुरुवारी (ता. 7) दुपारी आडीच वाजण्याच्या सुमारास येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सनराईज बीअर बार ऍण्ड परमीटमध्ये प्रवेश केला. बीअर बारचे मालक संदीप रमेश बासराणी (रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) याच्यावर दहशत निर्माण करीत, त्याना लाथाबुक्कयाने मारहाण केली. पॅश काऊंटरच्या मागील बाजूच्या दारुच्या बाटल्या जबरदस्तीने घेतल्या. यावेळी बार मधील कामगारांने अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता  बार मधील दारुच्या फोडीत त्याच्यावर ही दहशत निर्माण केली. त्यानंतर हे टोळे बार मधून बाहेर पडताना पॅश काऊंटरमधील रोकड घेवून पलायन केले.

लोकाची सतत वर्तळ असलेल्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात भरदिवसा घडल्यांने याची शाहुपूरी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली. या पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, हावलदार दिवाकर होवाळे, शशीकांत पोरे, बजरंग हेब्बाळकर, कॉन्स्टेबल प्रशांत घोलप, सागर डोंगरे, विजय इंगळे, दिगंबर पाटील, विशाल चौगुले आदीच्या पथकांने गुन्हा घडल्यापासून काही तासामध्ये कुख्यात गुंड देवेंद्र उर्फ डेब्या वाघमारेसह त्याचे साथिदार आकाश बिरंजे, सागर पिसे, अक्षय गिरी या चौघाचा शोध घेवून त्याच्या मुसक्या आवळल्या.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात टोळीची चांगलीच दहशत

कुख्यात गुंड देवेंद्र उर्फ डेब्या वाघमारेसह त्याच्या टोळीतील चौघे जण गेल्या काही महिन्यापूर्वी कारागृहाची हवा खाऊन बाहेर आले आहेत. या टोळक्याने शहरातील  मध्यवर्ती बसस्थानक परिसरात चांगलीच दहशत निर्माण केली होती. त्यामुळे या टोळीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यास कोणीही धजत नव्हते.

पोलीस चौकीची मोडतोड करुन होता पसारकुख्यात गुंड देवेंद्र उर्फ डेब्या वाघमारे यांने गेल्या महिन्यात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दमदाटी करीत होता. त्यावेळी त्याने परिसरातील शहर वाहतुक शाखेच्या पोलीस चौकीची मोडतोड करुन पसार झाला होता. या घटनेपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. पण तो मिळून येत नव्हता.