|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रोटरी फिजिओथेरपी सेंटरमधून सर्वसामान्यांना दिलासा

रोटरी फिजिओथेरपी सेंटरमधून सर्वसामान्यांना दिलासा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

रोटरीच्या फिजिओथेरपी सेंटर मधून सर्वसामान्य माणसांना दिलासा देण्याचे कार्य  केले आहे. असे प्रतिपादन गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांनी केले. रोटरी क्लब ऑफ शिरोली एमआयडीसी शाखेतर्फे शनिवारी फिजिओथेरपी दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी बोलताना गृह पोलिस उपअधिक्षक सतीश माने म्हणाले, चाळीशी नंतर फिजिओथेरपी उपचार महत्वाचा आहे. रोटरी क्लब ऑफ शिरोली एमआयडीसी सारख्या संस्थानी उभा केलेल्या फिजिओथेरपी सेंटर मधून सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळतो. रोटरीच्या सदस्यांचे दातृत्व मोठे आहे. अद्यायावत तंत्रज्ञानाने सज्ज सेंटरमध्ये अत्यंत अल्प दरात रूग्णांना औषधोपचार करून घेणे शक्य झाले आहे. फिजिओथेरिपिस्ट डे निमित्त सेंटरमधील कोल्हापुरातील ज्येष्ठ व पहिल्या फिजिओथरपिस्ट तज्ञ डॉक्टरांचा सत्कार करून त्यांचे कार्य प्रकाशात आणले आहे.

याप्रसंगी कोल्हापुरातील पहिले व जेष्ठ फिजिओथेरपिस्ट डॉ प्रमोद पोतनीस व डॉ दीपक तांबट यांचा सत्कार उप अधिक्षक माने यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ प्रमोद पोतनीस यांनी फिजिओथेरपी या उपचाराची ओळख सर्वप्रथम रोटरी क्लबने करून दिली असून अनेक रुग्णांचा सेंटरचा फायदा झाला आहे. रोटरी क्लब ऑफ शिरोली एमआयडीसीतर्फे रुग्णांना अल्प दरात वैद्यकीय सेवा व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. असे सांगितले. यानंतर रोटरीचे प्रदीप गांधी यांनी रोटरी सदस्यांच्या सहभागातून उभा केलेल्या टाकाळा येथील कोरगावकर कंपाऊंड मधील अत्याधुनिक फिजिओथेरपी सेंटरच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच नागरिकांनी या वैद्यकीय सेवा व सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यानंतर डॉ प्रियल माने व शुभदा कुलकर्णी यांनी शिबारात सहभागी रुग्णावर उपचार केले.यावेळी रोटरीचे अध्यक्ष शरद देसाई, सेक्रेटरी बलिराम व्हराडे, प्रदीप गांधी, राहुल मगदूम, सुनील जाधव,दीपक देसाई,शीतल मिरजे,राजू पाटील,सुभाष गांधी, शीतल मगदूम आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष शरद देसाई यांनी, आभार बलीराम व्हराडे यांनी तर सूत्रसंचालन राहुल मगदूम यांनी केले.