|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » केरळ पूर्वपदावर येण्यास वर्षभर लागणार

केरळ पूर्वपदावर येण्यास वर्षभर लागणार 

प्रतिनिधी/ मडगाव

केरळ मध्ये आलेल्या महापुरात मोठय़ा प्रमाणात हानी झाली. यातून सावरण्याचा केरळचा प्रयत्न सुरू आहे. या महापुरात अनेक घरे जमिन दोस्त झाली. त्यामुळे अनेक कुटूंबाचा निवारा गेला. अनेक लोक बेघर झाले. या लोकांसाठी पुन्हा नव्याने घरे बांधून देण्याचे काम केरळ सरकारने हाती घेतले आहे. केरळ राज्य पुन्हा पुर्वपदावर येण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याची माहिती केरळ सरकारचे मुख्य सचिव टॉम जुझे (आयएएस) यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.

केरळ सरकारचे मुख्य सचिव टॉम जुझे काल गोवा भेटीवर आले होते. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. महापूरामुळे झालेली हानी कोटय़ावधी रूपयांच्या घरात आहे. महापूर आल्यानंतर अनेक कुटूंबाना सुरक्षित स्थळी (छावणीत) हलविण्यात आले. त्यातील अवघीच कुटूंबे आपल्या मुळ घरी जाऊ शकलेली आहे. इतर कुटूंबे आजही छावणीत आहे. त्यांना आणखीन काही दिवस त्याच ठिकाणी ठेवले जाईल. कारण, या महापूरात त्यांची घरे जमीन दोस्त झालेली आहे. सद्या जी हानी झाली आहे, त्याची माहिती गोळा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

काही लोकांचे पुनर्वसन व पुनर्रचना करण्याचे काम सद्या युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. सद्या केरळातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पूराचे पाणी देखील ओसरले आहे. दहा लाखाहून जास्त लोकांना अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सहा लाखून जास्त लोकांना केरळ सरकारने प्रत्येकी दहा हजार अशी आर्थिक मदत दिल्याची माहिती मुख्य सचिव टॉम जुझे यांनी दिली.

केरळ पूरग्रस्तांना अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. केंद्र सरकार देखील मदत करीत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Related posts: